JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर लक्ष देण्याची अत्यंत गरज, WHO नं दिला सावधानतेचा इशारा

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर लक्ष देण्याची अत्यंत गरज, WHO नं दिला सावधानतेचा इशारा

Corona Virus Delta Variant: सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरससारख्या महामारीचा सामना करत आहे. देशासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनानं डोकंवर काढल्याचं चित्र आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जुलै: कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रार्दुभाव संपूर्ण जगभरात झाला आहे. सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरससारख्या महामारीचा सामना करत आहे. देशासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनानं डोकंवर काढल्याचं चित्र आहे. भारतात संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका वर्तवण्यात आला आहे. अशातच जागतिक आरोग्य संस्था (WHO) नं पुन्हा एकदा इशारा दिला आहे. WHO नं म्हटलं की, कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट **(Delta Variant)**जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. हा व्हेरिएंट कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा वेगानं पसरत आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. Breaking: राज कुंद्रा अटकेप्रकरणी समोर आली मोठी अपडेट कोरोना व्हायरसचा डेल्टा प्रकार लवकरच जगभरातील कोविड -19 मधील सर्वात मुख्य तणाव बनेल, असं जागतिक आरोग्य संघटना - दक्षिण-पूर्व आशियाचे विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग म्हणाल्या आहेत. कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट आता 100हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. ज्याप्रकारे या व्हेरिएंटचा प्रसार होत आहे, त्याप्रकारे तो लवकरच जागतिक स्तरावर सर्वात मोठा त्रास बनेल. डेल्टा व्हेरिएंट युके, यूएस, सिंगापूर आणि इतर अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. मुंबईत ड्रग्जचा धंदा करणाऱ्या फरार दोन महिला आरोपींचा NCBकडून शोध   पुढे त्या म्हणाल्या की, ज्याप्रकारे या व्हेरिएंटचा प्रसार होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. ही खूप चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हेरिएंट सर्वात वेगवान पसरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या