JOIN US
मराठी बातम्या / देश / 'मित्र म्हणून कायम लक्षात राहतील...', राज्यसभेमध्ये बोलताना मोदी झाले भावुक, पाहा VIDEO

'मित्र म्हणून कायम लक्षात राहतील...', राज्यसभेमध्ये बोलताना मोदी झाले भावुक, पाहा VIDEO

PM Modi in Rajya Sabha LIVE Update: एक खासदार म्हणून नाही तर एक मित्र म्हणून आझाद कायम लक्षात राहतील. पंतप्रधानांनी त्यांच्या कारकिर्दीची प्रशंसा केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: राज्यसभेमध्ये आज 4 निवृत्त खासदारांना निरोप देण्यात आला. यावेळी गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi on Gulam Nabi Azad) भावुक झाले होते. त्यांनी असे म्हटले की केवळ एक खासदार म्हणून नाही तर एक मित्र म्हणून आझाद कायम लक्षात राहतील. पंतप्रधानांनी त्यांच्या कारकिर्दीची प्रशंसा केली. त्याचप्रमाणे यापुढेही ते असेच कार्यरत राहतील अशीही अपेक्षा व्यक्त केली. केवळ पार्टीची नाही तर देशाची आणि सदनाचीही तेवढीच चिंता करणारे गुलाम नबी होते, असं पंतप्रधान म्हणाले. कोरोना काळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक गुलाम नबी यांच्या सूचनेनुसार घेतल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. त्याचा 28 वर्षांचा कार्यकाळ ही खूप मोठी बाब असल्याचंही यावेळी PM म्हणाले

संबंधित बातम्या

यावेळी पंतप्रधान असे म्हणाले की, ‘माझा पूर्ण विश्वास आहे की दयाळूपणा आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना शांततेत बसू देणार नाही. मला खात्री आहे की त्यांनी कोणतीही जबाबदारी सांभाळल्यास देशाला फायदा होईल. त्यांच्या सेवेबद्दल मी त्यांचे आदरपूर्वक आभार मानतो. मी त्यांना विनंती करेन की तुम्ही जरी या सदनात नसाल तरी माझे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच खुले राहतील. मी तुम्हाला सेवानिवृत्त होऊ देणार नाही.’ (हे वाचा- लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा मास्टरमाईंड दीप सिद्धूला अखेर अटक ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांची ती आठवण देखील सांगितली जेव्हा त्यांच्यामध्ये फोनवर संभाषण झाले होते. पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण सांगितली. त्यावेळी गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान यांना फोन केला होता आणि ते फोनवरच रडले होते. पंतप्रधान म्हणाले की, ’ मी त्यावेळी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. गुलाम नबी आझाद यांच्याशी माझे मैत्रिचे नाते आहे. राजकारणात वाद, वार-प्रतिवार सुरूच असतो. पण एक मित्र म्हणून मी त्यांचा खूप आदर करतो.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या