JOIN US
मराठी बातम्या / देश / पक्क्या घरांच्या इच्छेनं ग्रामस्थांना आला जोश, फावडं उचलत बांधला नवा रस्ता

पक्क्या घरांच्या इच्छेनं ग्रामस्थांना आला जोश, फावडं उचलत बांधला नवा रस्ता

गावात पक्की घरं बांधून (Villagers built road to welcome raw material for homes) मिळणार असल्याच्या स्वप्नापायी ग्रामस्थांनी अख्खा रस्ताच बांधून काढल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 31 ऑक्टोबर: गावात पक्की घरं बांधून (Villagers built road to welcome raw  material for homes) मिळणार असल्याच्या स्वप्नापायी ग्रामस्थांनी अख्खा रस्ताच बांधून काढल्याची घटना समोर आली आहे. अन्न, पाणी, निवारा या मूलभूत गरजांसाठी आदिवासी अजूनही झगडत आहेत. झारखंडमधील एका गावातील आदिवासी वर्षानुवर्षं (Villagers built road) कच्च्या घरांमध्ये राहत असून प्रत्येक ऋतुत नवी आव्हानं घेऊन जगत असतात. पंतप्रधान आवास योजनेत या गावात पक्की घरं बांधून देण्याचं ठरलं आणि गावकऱ्यांचा उत्साह दुणावला. योजना मंजूर पण… झारखंडमधील तालझारीजवळच्या सुदुरवर्ती डोंगररांगामध्ये खांडो बासा नावाचं एक दुर्गम गाव आहे. या गावातील लोकांना कधीही पक्की घरं मिळालेली नाहीत. पक्क्या घरात राहण्याचं त्यांचं पिढ्यानपिढ्यांचं स्वप्न अद्यापही स्वप्नच आहे. मात्र पंतप्रधान आवास योजनेतून हे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झालीय. या गावात योजना मंजूर झाली असून बांधकाम सुरू करायला अधिकारी सज्ज आहेत. समस्या आणि उपाय गावात रस्ता बांधायचं निश्चित झालं असलं, तरी त्यासाठी लागणारा कच्चा माल गावापर्यंत कसा आणायचा, असा प्रश्न होता. या दुर्गम भागात रस्त्याच्या कामासाठी लागणारं सिमेंट, वाळू आणि इतर सामान आणणं आव्हानात्मक होतं. या कारणासाठी गावातील मंजूर झालेली योजना रद्द होते की काय, अशी भीती ग्रामस्थांना वाटत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी ही समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला. हे वाचा- चाळीशी उलटूनही सुटेना मुलाची हौस, अपत्यप्राप्तीसाठी सुरूय तिसऱ्या लग्नाची तयारी हातात घेतलं फावडं रस्त्या नसल्यामुळं पक्क्या घरांचं स्वप्न मोडायला नको, यासाठी त्यांनी स्वतःच रस्ता बांधायचं ठरवलं. दिवसरात्र श्रमदान करत गावकऱ्यांनी शहरात येण्यासाठी रस्ता तयार केला. पक्क्या घऱाची प्रेरणा इतकी मोठी होती की त्यापायी रस्ता तयार करणं, हे गावकऱ्यांना आव्हानदेखील वाटलं नाही. ग्रामस्थांच्या पुढाकाराने झालेल्या या रस्त्यामुळे पक्क्या घरांच्या स्वप्नातील मोठा अडथळा दूर झाला आहे. या उपक्रमाचं आणि गावकऱ्यांचं पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या