ग्वाल्हेर, 29 जानेवारी: ग्वाल्हेरचे कलेक्टर कौशलेंद्र विक्रम सिंह यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Gwalior Collector Kaushalendra Vikram Singh video viral on social media) होत आहे. ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठात परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीवरुन NSUI ने नुकताच येथे गोंधळ घातला होता. NSUI ने गेटचं टाळंही तोडलं होतं. याबाबत सूचना मिळताच कलेक्टर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आधी विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांसह गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा घेतली, त्यानंतर परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यास सांगितली. मिळालेल्या माहितीनुसार, जिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थी गेल्या एक आठवड्यापासून आंदोलन करीत होते. आंदोलनाची सुरुवात NSUI चे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज यादव करीत होते. विद्यार्थ्यांनी इतका गोंधळ घातला की, ते विद्यापीठाचं मुख्य गेटचं टाळं तोडून आत शिरले. यादरम्यान विद्यापीठ प्रशानाने विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी परिस्थिती त्यांच्याही हातात राहिली नाही. विद्यापीठात गोंधळ वाढल्याचं जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांना कळताच ते जिवाजी विद्यापीठात पोहोचले. येथे जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र NSUI चे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज यादव हा कलेक्टर कौशलेंद्र विक्रम सिंह यांच्यासोबत वाद करू लागला. यावर कलेक्टर यांनी शिवराज यादवला विचारलं की, तुम्ही विद्यापीठाच्या कोणत्या वर्गात शिकता? शिवराज म्हणाला की, तो विद्यार्थी नाही तर पदाधिकारी आहे. त्यानंतर कलेक्टर यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे अभ्यासाविषयी विचारपूस केली. हे ही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली, ‘या’ खास विषयावर साधणार संवाद कलेक्टरांनी NSUI पदाधिकारीला तुरुंगात पाठवण्यास सांगितलं.. कलेक्टरांनी गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की, अभ्यास करायला येत असाल तर नेतागिरी करू नका. यावर विद्यार्थ्यांनीही आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, आम्ही अभ्यास करतो. मात्र यंदा अभ्यास करायला वेळ मिळाला नाही. म्हणून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. यानंतर पुन्हा कलेक्टरांनी त्यांना अभ्यासाविषयी विचारलं. यावर कोणी LLM तर कोणी Msc करीत असल्याचं सांगितलं.
यानंतर कलेक्टरांनीही विद्यार्थ्यांची चांगलीच कानउघडणी केली. ते म्हणाले की, वर्षभर अभ्यास करण्याऐवजी तुम्ही नेतागिरी करत असाल तर वेळ कसा मिळेल. यावर NSUI चे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज यादव त्यांच्यासोबत वाद घालू लागला. कलेक्टर यांनी शिवराज यादवला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात पाठवलं. यानंतर विद्यापीठ प्रशासनासोबत बातचीत करून विद्यार्थ्यांची परीक्षा 10 दिवस पुढे ढकलण्यास सांगितली.