JOIN US
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान मोदींवर लिहिलेलं पुस्तक ‘Modi @20: Dreams Meet Delivery’ प्रकाशित, जाणून घ्या, काय आहे पुस्तकात

पंतप्रधान मोदींवर लिहिलेलं पुस्तक ‘Modi @20: Dreams Meet Delivery’ प्रकाशित, जाणून घ्या, काय आहे पुस्तकात

पुस्तकात पंतप्रधान मोदींचे विविध पैलू मांडण्यात आले आहेत, असंही नायडू म्हणाले. त्यांचे अग्रगण्य विचार, सक्रिय दृष्टीकोन आणि परिवर्तनवादी नेतृत्व शैलीचं सखोल विश्लेषण केलं गेलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर लिहिलेल्या ‘Modi@20: Dreams Meet Delivery’ या पुस्तकाचे बुधवारी विज्ञान भवनात आयोजित एका भव्य कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी पुस्तकाचं प्रकाशन करताना म्हटलं की, पंतप्रधान मोदी (Book on PM Modi releases) हे असे नेते आहेत, ज्यांनी जगाला दाखवून दिलं की, स्वप्नं खरोखरच सत्यात उतरू शकतात. या विशेष प्रसंगी, गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह केंद्र सरकारचे अनेक मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुस्तकाबद्दल बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले, “हे पुस्तक एक दुर्मीळ संकलन आहे, जे वाचकांना आधुनिक भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या नेत्याच्या उदयाविषयी सांगते.” हे प्रख्यात तज्ज्ञ आणि विचारवंतांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. ‘Modi@20: Dreams Meet Delivery’ हे रूपा पब्लिकेशनने प्रकाशित केलं आहे. पुस्तकाच्या लेखकांचं अभिनंदन करताना नायडू म्हणाले की, त्यांनी नरेंद्र मोदींच्या गेल्या 20 वर्षांच्या रोमांचक प्रवासाची उत्कृष्ट रूपरेषा मांडली आहे. देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत आपल्या अभिभाषणात उपराष्ट्रपती म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर जन्मलेले नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी आधी जवळपास 13 वर्षं गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनतेची सेवा केली आणि आता देशाचे पंतप्रधान म्हणून गेली 8 वर्षं आहेत.” ते देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गेल्या 20 वर्षांत त्यांनी स्वत:साठी एक अनोखी जागा तयार केली आहे. हे वाचा -  राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय पुस्तकातून मोदींचे विचार समजू शकतात पुस्तकात पंतप्रधान मोदींचे विविध पैलू मांडण्यात आले आहेत, असंही नायडू म्हणाले. त्यांचे अग्रगण्य विचार, सक्रिय दृष्टीकोन आणि परिवर्तनवादी नेतृत्व शैलीचं सखोल विश्लेषण केलं गेलं आहे. हे वाचा -  अवघे 4 सेकंद अन् अनियंत्रित कारच्या कचाट्यात सापडले 6 जण; भीषण अपघाताचा VIDEO कार्यक्रमात उपराष्ट्रपती म्हणाले, ‘मोदीजींचा प्रवास, शब्द, कृती आणि त्यांचे स्वप्न साकार करण्याची गरज आहे. मोदींचे विचार समजून घेण्यासाठी या पुस्तकाची नक्कीच मदत होईल. त्यांनी आपल्या देशातील लोकांसाठी मोठी स्वप्ने पाहण्याचं धाडस कसं केलं आणि ते प्रत्यक्षात आणून भारतातील करोडो लोकांचे जीवन कसं बदललं, हे पुस्तक वाचून समजू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या