JOIN US
मराठी बातम्या / देश / लाखो रुपये तिकीट तरीही गंगा विलास क्रूझचं 2 वर्षांचं बुकिंग फुल, सुविधा पाहून व्हाल हैराण!

लाखो रुपये तिकीट तरीही गंगा विलास क्रूझचं 2 वर्षांचं बुकिंग फुल, सुविधा पाहून व्हाल हैराण!

13 जानेवारी 2023 रोजी वाराणसीपासून सुरू झालेली क्रूझ यूपीमधल्या गाझीपूरला पोहोचली आहे.

जाहिरात

गंगा विलास क्रूझ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वाराणसीमधून 13 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातल्या सर्वांत लांब अंतराच्या क्रूझला म्हणजेच आलिशान गंगा विलास क्रूझला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला होता. फाइव्ह स्टार म्हणजेच पंचतारांकित लक्झरी सुविधा असलेल्या या क्रूझचं तिकीट लाखो रुपये आहे. तरीही विदेशी पर्यटकांना या क्रूझच्या बुकिंगसाठी वाट पाहावी लागतेय. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या क्रूझचं 2024पर्यंत म्हणजेच जवळपास दोन वर्षांसाठीचं बुकिंग जवळपास पूर्ण झालं आहे. क्रूझचे डायरेक्टर राज सिंह यांनीही याला दुजोरा दिलाय. 13 जानेवारी 2023 रोजी वाराणसीपासून सुरू झालेली क्रूझ यूपीमधल्या गाझीपूरला पोहोचली आहे. या क्रूझची सध्या जगभरात चर्चा आहे. कारण या क्रूझने भारत आणि बांगलादेशला रिव्हर क्रूझ लाइनच्या नकाशावर जोडलं आहे. क्रूझचे डायरेक्टर राज सिंह यांनी सांगितलं की, ‘2023 च्या सप्टेंबरमध्ये ही क्रूझ पुन्हा वाराणसीहून दिब्रुगढला रवाना होईल व त्यानंतर ती पुन्हा 2024 मध्ये वाराणसीला येईल.’

काय आहेत सुविधा?

पंचतारांकित लक्झरी सुविधा असलेल्या या क्रूझमध्ये पर्यटकांसाठी विशेष सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या क्रूझमध्ये 18 सूट रूमव्यतिरिक्त स्पा सेंटर, रेस्टॉरंट, जिम, हॉल यांसह इतर अनेक सुविधा आहेत. याशिवाय क्रूझच्या छतावर सन बाथसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलीय.

पती रायफलची साफसफाई करताना चुकून गोळी सुटली अन् पत्नी आली समोर

क्रूझची वैशिष्ट्यं

ही क्रूझ भारतात तयार करण्यात आली आहे. क्रूझमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प आहे. यात पाणी फिल्टरचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलीय. हे पाणी फिल्टर करून वापरण्यायोग्य केलं जाऊ शकतं. याशिवाय क्रूझची इंधन टाकी 40 हजार लिटरची आहे. ती एकदा पूर्ण भरली की पुन्हा 35 ते 40 दिवस इंधन रिफिलिंग करण्याची आवश्यकता नाही. या क्रूझमध्ये एका वेळी 36 पर्यटक आणि 40 क्रू मेंबर्स बसू शकतात.

अयोध्येतील भव्य राम मंदिराचं बांधकाम अंतिम टप्प्यात; या सणाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता

संबंधित बातम्या

 जगातल्या सर्वांत लांबीच्या रिव्हर क्रूझचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत उद्घाटन केल्यानंतर तिची खूप चर्चा सुरू आहे. वाराणसी ते दिब्रुगढमार्गे बांगलादेश असा क्रूझचा प्रवास असेल. या 50 दिवसांच्या प्रवासादरम्यान अनेक जागतिक वारसा स्थळांच्या ठिकाणी क्रूझ थांबणार आहे. सुंदरबन, काझीरंगा यांसारखी काही राष्ट्रीय उद्यानं व अभयारण्यांमधूनही क्रूझ मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळेच या क्रूझचं दोन वर्षांचं बुकिंग आताच पूर्ण झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या