JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोना लसीमुळे एका वर्षात वाचले 42 लाख भारतीयांचे प्राण; जाणून घ्या जगभरातील आकडा

कोरोना लसीमुळे एका वर्षात वाचले 42 लाख भारतीयांचे प्राण; जाणून घ्या जगभरातील आकडा

जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम भारतात युद्धपातळीवर राबवण्यात आली. या मोहिमेमुळे तब्बल 42 लाख भारतीयांचे प्राण वाचवण्यात यश (Vaccination Drive saved lives of 42 lakh Indians) मिळाल्याचे लॅन्सेटच्या एका अहवालात (Lancet Study) समोर आले

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 24 जून : कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम भारतात युद्धपातळीवर राबवण्यात आली. या मोहिमेमुळे तब्बल 42 लाख भारतीयांचे प्राण वाचवण्यात यश (Vaccination Drive saved lives of 42 lakh Indians) मिळाल्याचे लॅन्सेटच्या एका अहवालात (Lancet Study) समोर आले आहे. तसंच, जगभरात लसीकरणामुळे सुमारे 2 कोटी लोकांचा जीव कोरोना लसीमुळे वाचल्याचंही (COVID Vaccination saved life of 2 crore people) या अहवालात स्पष्ट करण्यात आलं. डिसेंबर 2020 ते डिसेंबर 2021 या कालावधीमधील आकडेवारीनुसार हा रिसर्च करण्यात आला. लंडनमधील इंपिरिअल कॉलेजने याबाबतचा रिसर्च केला आहे. या कॉलेजमधील प्रोफेसर ऑलिव्हर वॉट्सन यांनी सांगितलं, की कोरोना महामारीला तोंड देताना लसीकरणाचे अगदी चांगले परिणाम दिसून आले. डेल्टा व्हेरियंटमुळे मोठी लाट आलेला भारत हा पहिलाच देश होता, त्यामुळे या ठिकाणी लसीकरणाची (Vaccination in India) भूमिका महत्त्वाची ठरली. कोरोनाच्या या लाटेमध्ये कोविड लसीमुळे लाखो लोकांचे प्राण वाचले. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. प्रत्येक देशात वेगळा प्रभाव राजकीय घडामोडी, पावसाळ्याच्या तोंडावर कोरोना बळावतोय; निष्काळजीपण येईल अंगलट कोरोना लसीचा प्रभाव हा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा असल्याचं या रिसर्चमध्ये स्पष्ट झालं. 2021 सालाच्या मध्यानंतर विकसित देशांमध्ये कोरोनाची मोठी लाट आली होती. पहिल्या लाटेतून सावरल्यानंतर लगेचच या देशांमधील कोरोना निर्बंध हटवले गेले होते. त्यामुळेच कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणावर झाला होता, असंही या रिसर्चमध्ये समोर आलं. …तर वाचले असते आणखी पाच लाख जीव जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) लक्ष्य जर पूर्ण झालं असतं, तर जगभरात आणखी पाच लाख लोकांचा जीव वाचवता आला असता; असंही या रिसर्चमध्ये म्हटलं आहे. 2021 सालाच्या अखेरपर्यंत जगभरातील 40 टक्के लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात यावा हे लक्ष्य (WHO Target for covid vaccination) जागतिक आरोग्य संघटनेने ठेवलं होते. मात्र कित्येक कारणांमुळे ते शक्य झालं नाही. पावसाळ्यात आजारी पडताच घेता अँटिबायोटिक्स, वेळीच व्हा सावध! ही सवय ठरू शकते घातक सध्या भारतात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 196 कोटींहून अधिक डोस (India COVID Vaccination) देण्यात आले आहेत. तर, अधिकृत आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 5,24,941 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. देशातील दैनंदिन नव्या कोविड रुग्णांची संख्या (India Corona Update) ही 50 हजारांहून अधिक झाली असून, गुरूवारी (23 जून) महाराष्ट्रात पाच हजारांहून अधिक कोविड रुग्णांची नोंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या