JOIN US
मराठी बातम्या / देश / Uttarakhand Accident: उत्तरकाशीत भीषण अपघात, बोलेरो दरीत कोसळली, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जखमी

Uttarakhand Accident: उत्तरकाशीत भीषण अपघात, बोलेरो दरीत कोसळली, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जखमी

उत्तरकाशीत एक भीषण अपघात झाला आहे. बोलेरो दरीत कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 मे : महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीला उत्तरकाशीत (Uttarkashi) अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली बोलेरो (Bolero accident) गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 10 जखमी झाले आहेत. उत्तरकाशीतील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर स्यानाचट्टी जवळ हा भीषण अपघात (major accident) झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. एसडीआरएफच्या टीमने 10 जणांना रेस्क्यू केलं आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील भाविक बोलेरो गाडीने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बडकोटच्या दिशेने निघाले होते. त्याच दरम्यान वाटेत त्यांच्या गाडीला अपघात झाला. जमुनोत्रीपासून काही किलोमीटर अंतरावर असताना बोरेलो गाडी दरीत कोसळली. गाडी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गाडीचा अपघात झाला त्यामध्ये एकूण 13 प्रवासी होते. ज्यापैकी दोन पुरुष आणि एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर 10 जण जखमी झाले आहेत. वाचा :  बाईक आणि जीपची जोरदार धडक, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद मृतकांची नावे पूरण नाथ (वय 40 वर्षे) - मुंबईतील अंधेरी येथील निवासी जयश्री अनिल कोसरे (वय 26 वर्षे) - तुमसर जिल्हा भंडारा अशोक महादेव राव (वय 40 वर्षे) - नागपूर जखमींची नावे प्रेरणा (वय 8 वर्षे) महाराष्ट्र अंजू अशोक (वय 4 वर्षे) - नागपूर, महाराष्ट्र बोदी (वय 10 वर्षे) तुमसर, भंडारा जिल्हा प्रमोद तुलसी राम (वय 52 वर्षे) महाराष्ट्र बालकृष्ण जीटू (वय 41 वर्षे) तुमसर, भंडारा जिल्हा लक्ष्मी बाळकृष्ण कोसरे (वय 46 वर्षे) - तुमसर, भंडारा जिल्हा दिनेश (वय 35 वर्षे) तुमसर, जिल्हा भंडारा मोनिका (वय 24 वर्षे) तमसर, जिल्हा भंडारा कृषिता (वय 15 वर्षे) - भंडारा, महाराष्ट्र रचना (वय 38 वर्षे) - भंडारा, महाराष्ट्र अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. दरीत उतरत एसडीआरएफच्या टीमने 10 जणांना बाहेर काढले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो अतिशय अरुंद रस्ता असून तेथे सुरक्षेची व्यवस्थाही नसल्याचं बोललं जात आहे. उपजिल्हाधिकारी शालिनी नेगी यांनी सांगितले की, यमुनोत्री येथे झालेल्या अपगातात एका महिलेसह एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गाडी चालकाचाही समावेश आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे. जखमींमध्ये चार लहान मुलांचाही समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या