Board exam
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषद (UPMSP) अर्थात यूपी बोर्डाने यावर्षी घेण्यात येणाऱ्या हायस्कूल आणि इंटरमीडिएट क्लासेसच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी (10 फरवरी 2021) रोजी जाहीर केले आहे. upmsp.edu.in या त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. 2020-2021 या शैक्षणिक वर्षात खासगी शाळांमध्ये हायस्कूल आणि इंटरमीडिएट वर्गात शिकणारे विद्यार्थी परिषदेच्या या वेबसाइटवर जाऊन थेट डाऊनलोड करू शकतात.
यूपी माध्यमिक शिक्षण परिषदेचे सचिव दिव्यकांत शुक्ला यांनी जारी केलेल्या यूपी बोर्ड हायस्कूल आणि इंटरमिजिएट टाइम टेबल 2021 च्या पीडीएफनुसार दोन्ही वर्गाच्या बोर्ड परीक्षा शनिवार 2 एप्रिल 2021 पासून सुरू होणार आहेत.दोन्ही वर्गांचे पेपर हे दोन वेगवेगळया शिफ्ट मध्ये ठेवण्यात आले आहेत. पहिली शिफ्ट सकाळी 8 ते 11.15 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते संध्याकाळी 5.15 या वेळेत असणार आहे.सगळ्यात आधी हायस्कूल बोर्डाच्या परीक्षा 10 मे ला गणिताच्या पेपरसोबत संपतील त्याचबरोबर 12 मे ला इंटरमिजिएट परीक्षा नागरिक शास्त्रच्या पेपरसोबत समाप्त होतील. (हे वाचा - …तर बड्या अधिकाऱ्यांना अटक होणार, केंद्र सरकार Twitter विरोधात आक्रमक) 2021 बोर्ड परीक्षांसाठी विषयवार अभ्यासक्रम जाहीर: संपूर्ण देशात कोरोना साथीचा झालेला उद्रेक पाहता त्याचा परिणाम हा शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा झाला आहे. या वर्षी बहुतांश शाळांमध्ये अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. त्याचं आधारावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या वर्षी अभ्यासक्रमात कपात करण्याच जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषदेने देखील हायस्कूल आणि इंटरमीडिएट क्लासेसच्या विविध विषयांसाठी अभ्यासक्रम जारी केला आहे. दोन्ही वर्गांचे विद्यार्थी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून वेगवेगळ्या विषयांसाठी जाहीर केलेला नवीन अभ्यासक्रम डाउनलोड करू शकतात.