नवी दिल्ली, 10 मार्च: यूपी, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडसह (UP, Goa, Manipur and Uttarakhand) देशातील इतर तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) जनादेश निर्णायक ठरल्याने भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यूपीची राजधानी लखनऊसह राज्यातील इतर शहरांमध्ये असलेल्या भाजप कार्यालयांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येत आहे. पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जल्लोष करत आहेत. लखनऊमधील पक्ष कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं लोक पोहोचले आहे. यासोबतच मिठाईचे वाटपही सुरू झालं आहे. आनंदाच क्षण आहे. भाजपला विजयाची माहिती मिळाल्यापासून कार्यकर्ते जल्लोषात बिझी आहेत. ढोल-ताशांसह अनेक कार्यकर्ते नाचताना दिसत आहेत. भाजपचा एक कार्यकर्ता डोक्यावर बुलडोझर घेऊन फिरत आहे. आतापर्यंत बुलडोझर सर्व्हिसिंगवर जायचा, आता सर्व माफियांवर बुलडोझर चालणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यांच्या मते योगीजी आता आपल्या बुलडोझरने समाजकंटकांचा नायनाट करतील. सगळे बुलडोझर या पक्षाच्या कार्यकर्त्याला बाबा म्हणून संबोधत आहेत.
लखनऊमधील भाजप पक्ष कार्यालयाबाहेर सकाळपासूनच गर्दी दिसत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनंतर भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा होत असल्याने येथील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून येथील कार्यकर्त्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. पक्ष कार्यालयाबाहेर उपस्थित लोक सतत मोदीजी आणि योगी यांच्या घोषणा देत आहेत. कार्यकर्ते कमळ आणि मोदीजींचा झेंडा फडकावत विजयाचा आनंद साजरा करत आहेत. मोठ्या संख्येनं लोक कार्यालयाबाहेर जमले आहेत आणि विजयी फरकाच्या अपडेटवर सतत लक्ष ठेवून आहेत. योगी आदित्यनाथांचा रेकॉर्ड उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा सरकार बनवताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर इतिहास रचणार असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद होणार आहे. (Chief Minister of Uttar Pradesh) कार्यकाळ पूर्ण करून सत्तेवर येणारे पहिले मुख्यमंत्री उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री बनतील, जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात आजवर असं घडलेलं नाही. याआधी यूपीमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत. मात्र त्यापैकी एकानंही पहिला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. यामध्ये संपूर्णानंद, चंद्र भानू गुप्ता आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्या नावांचा समावेश आहे. 5 वर्षे पूर्ण करून सत्तेत परत वापसी 2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाला सत्ता देणार असून उत्तर प्रदेशच्या इतिहासातील असे पहिले मुख्यमंत्री बनतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली कोणताही पक्ष 5 वर्षे पूर्ण करून सत्तेत वापसी करत आहे.