JOIN US
मराठी बातम्या / देश / UP Election Result 2022 : दमदार विजय मिळवल्यानंतर योगींची मोठी घोषणा, म्हणाले...

UP Election Result 2022 : दमदार विजय मिळवल्यानंतर योगींची मोठी घोषणा, म्हणाले...

‘गेल्या 5 वर्षांत सुरक्षा दिली आहे. भाजपने यूपीच्या विकासासाठी काम केले आहे. जातीवाद आणि परिवार वादाला जनतेनं स्पष्टपणे नाकारून भाजपला विजय मिळवून दिला’

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 10 मार्च : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Election Result 2022) योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी पुन्हा एकदा दमदार विजय मिळवला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण विजय मिळवला आहे, त्यामुळे आपल्याला जनतेच्या विश्वासावर उतरायचं आहे. उत्तर प्रदेशला आता देशातील नंबर एकचं राज्य  बनवायचे आहे’, असा निर्धारच योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्येमध्ये विजय मिळवल्यानंतर  योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शनं केलं. यावेळी मोदी मोदी आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पंतप्रधान मोदींच्या (pm narendra modi) नेतृत्वाखाली आज भाजपला यूपी, यूपी, मणिपूर आणि गोव्यात जनादेश मिळाला आहे. मंत्रिमंडळातील सदस्य आणि भाजपचे सर्व पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते यांच्यावतीने उत्तरप्रदेशच्या जनतेचे आभार मानतो. हा विजय विरोधकांना उत्तर देणारा आहे, आपल्या जोशसोबत हौश सुद्धा ठेवायचे आहे. लोकांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करत राहायाचे आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश एक नंबरचे राज्य बनवायचे आहे, असा विश्वास योगींनी व्यक्त केला. ‘ज्यावेळी आपण कोरोना, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होतो, त्यावेळी ही लोक आपल्याविरोधात षडयंत्र रचत होती. पण जनतेनं मतदानातून यांना धडा शिकवला आहे’ असं म्हणत योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी विजयाबद्दल यूपीच्या जनतेचे आभार मानले. राष्ट्रवादी, सुशासन, सुरक्षा आणि विकासाच्या मुद्यावर जनतेनं भाजपाला मतदान केले आहे. त्यामुळे आपल्यााला जनतेच्या विश्वासावर उतरावे लागणार आहे. जनतेनं आपल्याला संधी दिली आहे, त्यांना निराश करून चालणार नाही. महिला आणि मुलीनी भाजपला मतदान केले आहे. त्यामुळे भाजप उत्तर प्रदेशमध्ये इतिहास निर्माण करत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा प्रचंड बहुमत मिळत आहे. ते आपल्यासाठी खूप मोलाचे आहे, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आज भाजपला यूपी, यूपी, मणिपूर आणि गोव्यात जनादेश मिळाला आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारने गेल्या 5 वर्षांत सुरक्षा दिली आहे. भाजपने यूपीच्या विकासासाठी काम केले आहे. जातीवाद आणि परिवार वादाला जनतेनं स्पष्टपणे नाकारून भाजपला विजय मिळवून दिला आहे, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. कोरोनाच्या काळात आपण अखंडपणे काम केलं. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलो आहे. हा विजय प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे. कोरोनाच्या संकटामध्ये आपण गरिबांच्या घरी राशन पोहोचवले. गरिबांच्या घरी मदत पोहोचवली. ज्यावेळी आपण कोरोना, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होतो, त्यावेळी ही लोक आपल्याविरोधात षडयंत्र रचत होती. पण जनतेनं मतदानातून यांना धडा शिकवला आहे, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या