उत्तर प्रदेश, 10 मार्च: उत्तर प्रदेश निवडणुकीच्या (Uttar Pradesh election) निकालाचे चित्र स्पष्ट झालं आहे. पुन्हा एकदा भाजप युपीच्या तख्तावर विराजमान होणार आहे. एकीकडे भाजपच्या विजयाबद्दल अनेक लोक पीएम मोदी (PM Modi) आणि योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचं अभिनंदन करत आहे. तर त्याचवेळी सोशल मीडियावर काही लोक कवी मुनव्वर राणा यांचा थट्टा करण्यात बिझी आहेत. मुनव्वर राणा सोशल मीडियावर ट्रोल राजकारण ही अशी गोष्ट आहे की, त्याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगता येत नाही. एकदा मुलाखतीदरम्यान मुनव्वर राणा म्हणाले होते की, यूपीमध्ये पुन्हा भाजप आला तर उत्तर प्रदेश सोडेन. आता यूपीच्या राजकारणाचा चित्र स्पष्ट होताच लोकांना मुनव्वर राणा यांचं जुनं विधान आठवलं.
सोशल मीडिया यूजर्संना ट्विटरवर मीम्स बनवण्याची संधी मिळाली आहे. लोकांनी मुनव्वर राणा यांची मज्जा घ्यायला सुरुवात केली. यूपीमध्ये कमळ फुललेलं पाहून लोक मुनव्वर राणा यांना विचारत आहेत की, आता योगी सरकारने यूपीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. आता कुठे जाणार? हा फक्त एक छोटासा नमुना आहे. पुढे, मुनव्वर राणाबद्दल लोक काय म्हणत आहेत ते ट्विटद्वारे एकदा पाहा.
भाजपच्या विजयानंतर मुनव्वर राणा सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. मात्र अद्याप मुनव्वर राणा यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आता सरकार स्थापनेनंतर मुनव्वर आपल्या वक्तव्यावर ठाम राहतात का ते बघू. योगी आदित्यनाथांचा रेकॉर्ड उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा सरकार बनवताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर इतिहास रचणार असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद होणार आहे. (Chief Minister of Uttar Pradesh) कार्यकाळ पूर्ण करून सत्तेवर येणारे पहिले मुख्यमंत्री उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री बनतील, जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात आजवर असं घडलेलं नाही. याआधी यूपीमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत. मात्र त्यापैकी एकानंही पहिला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. यामध्ये संपूर्णानंद, चंद्र भानू गुप्ता आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्या नावांचा समावेश आहे. 5 वर्षे पूर्ण करून सत्तेत परत वापसी 2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाला सत्ता देणार असून उत्तर प्रदेशच्या इतिहासातील असे पहिले मुख्यमंत्री बनतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली कोणताही पक्ष 5 वर्षे पूर्ण करून सत्तेत वापसी करत आहे.