JOIN US
मराठी बातम्या / देश / Corona च्या दुसऱ्या लाटेत भारतात 2.4 लाख मृत्यू, UN नं भारताला दिला इशारा

Corona च्या दुसऱ्या लाटेत भारतात 2.4 लाख मृत्यू, UN नं भारताला दिला इशारा

कोरोना व्हायरसबाबत संयुक्त राष्ट्रानं (United Nations) भारताला इशारा दिला आहे.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 जानेवारी: भारतात कोरोना व्हायरसनं (corona virus) पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा नवा उच्चांक गाठतो. अशातच कोरोना व्हायरसबाबत संयुक्त राष्ट्रानं (United Nations) भारताला इशारा दिला आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (second wave) म्हणजेच डेल्टा व्हेरिएंटमुळे एप्रिल ते जून दरम्यान 2.4 लाख लोकांचा मृत्यू झाला आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीवर झाला, असा दावा यूएनच्या अहवालात (UN report) करण्यात आला आहे. एवढंच नाही तर आगामी काळातही अशीच परिस्थिती लवकरच निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. UN च्या वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स (WESP) 2022 च्या अहवालानुसार, Omicron प्रकारामुळे संसर्गाच्या नवीन लाटा येत आहेत आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर वाढणार आहे. अहवालात असं म्हटलं आहे की, एप्रिल ते जून या कालावधीत भारतात डेल्टा लाटेमुळे 2.4 लाख लोकांचा मृत्यू झाला. UN च्या अहवालात म्हटले आहे की, जर कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लसीच्या प्रवेशासह जागतिक दृष्टीकोन अवलंबला गेला नाही तर महामारी संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोका बनून राहील. त्यासोबतच दक्षिण आशियापुढे मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. येथे कोरोना लसीकरणाच्या संथ गतीमुळे नवीन व्हेरिएंट अधिक वाढ आणि प्रकरणांची संख्या वाढण्यास प्रोत्साहन मिळेल. भारतात ओमायक्रॉन आणि कोरोनाची प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात आतापर्यंत लसीचे 154 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. देशात संसर्ग आणि मृत्यू झपाट्यानं वाढले आहेत. त्यामुळे देशाची आरोग्य व्यवस्थाही कोलमडली होती. आता भारतात ओमायक्रॉन आणि कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हेही वाचा-   U19 वर्ल्ड कपचा आजपासून थरार, भारतासह 4 टीम विजेतेपदाच्या दावेदार   या अहवालात असे नमूद करण्यात आलं आहे की, डिसेंबर 2021 पर्यंत नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशातील 26% पेक्षा कमी लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. तर भूतान, मालदीव, श्रीलंका येथे 64% पेक्षा जास्त लोकांना लस मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या