JOIN US
मराठी बातम्या / देश / ऑनलाइन गेममुळे दोन भाऊ बेपत्ता; मोबाइल फोनचं व्यसन कुटुंबावर पडलं भारी

ऑनलाइन गेममुळे दोन भाऊ बेपत्ता; मोबाइल फोनचं व्यसन कुटुंबावर पडलं भारी

जर तुमचा मुलगा ऑनलाइन गेम (Online Game) खेळतो किंवा त्याचा अधिकतर वेळ मोबाइलवर गेम खेळण्यात जात असेल तर पालकांनी याबाबत अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण ही सवय तुमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 जानेवारी : जर तुमचा मुलगा ऑनलाइन गेम (Online Game) खेळतो किंवा त्याचा अधिकतर वेळ मोबाइलवर गेम खेळण्यात जात असेल तर पालकांनी याबाबत अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण ही सवय तुमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. ऑनलाइन गेमच्या नादात झाला बेपत्ता.. साहिबाबादमधील शालीमार गार्डनमध्ये राहणारे दोन भाऊ जे अवघे 12 ते 9 वर्षांचे आहे. ऑनलाइन गेम (Online Game) च्या नादात ते घराबाहेर पडले. आणि तब्बल 16 तासांपर्यंत बेपत्ता (Missing) होते. पोलीस आणि (Police) एनजीओच्या (NGO) मदतीने दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ऑनलाइन गेमचं असं व्यसन जडलं की मुलं घरातून 30 हजार रुपये घेऊन फरार झाले. काय आहे संपूर्ण प्रकरण? 12 वर्षांचा मोहित आपल्या आई-वडिलांसह शालीमार गार्डन येथे राहतो. तो सातवीत शिकतो. लॉकडाउनमध्ये (Lockdown) जेव्हा शाळांनी ऑनलाइन क्लास (Online Class) सुरू केली तर कुटुंबाने आपला फोन त्यांना दिला. यादरम्यान मोहितने आपल्या मित्रांसह मोबाइलवर गेम पाहण्यास सुरुवात केली. यानंतर मित्रांनीही त्याचा आयडी तयार (ID) केला. ऑनलाइन गेमचं लागलं व्यसन.. आयडी तयार केल्यानंतर आपल्या फोनवरुन मोहितने पबजी (PUBG) खेळण्यास सुरुवात केली. गेममध्ये पुढे जाण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र मोहितला गेमसाठी घरातून पैसे दिले जात नव्हते. यासाठी तो कधी आपल्या वडिलांच्या खिशातून तर कधी आईच्या पर्समधून पैसे काढत होता. पबजी बंद झाल्यानंतर त्याने फ्री फायर (Free Fire) खेळण्यास सुरुवात केली. मोहित 30 डिसेंबर रोजी आपल्या घरातून 30 हजार रुपये घेऊन फरार झाला. तो नोएडाला निघून आलाय यानंतर त्याने कोणाच्या मदतीने 18 हजारांचा मोबाइल फोन (Mobile Phone), स्मार्ट वॉच (Smart Watch) आणि हेड फोन (Head Phone) खरेदी केलं. पोलिसांनी मुलांना काढलं शोधून.. ही दोन्ही मुलं इतकी स्मार्ट होती की ते सिमकार्ड न घालता केवल वायफायच्या मदतीने कनेक्ट करून गेम खेळत होते. यादरम्यान कुटुंबीय चिंतेत होते. त्यांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी त्यांना दिलशाद गार्डन येथून पकडलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या