कोटा, 26 एप्रिल : वैद्यकीय महाविद्यालयाचा (Medical college) वीजपुरवठा तब्बल तीन तास ठप्प (power cut) झाला. यादरम्यान विविध वॉर्डांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना उपचारासाठी त्रास सहन करावा लागत होता. मोबाईल टॉर्चच्या (mobile torch) प्रकाशात डॉक्टरांनी रुग्णांनी उपचार केले. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. इलेक्ट्रिक पॅनलमध्ये बिघाड झाल्याने रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे या सर्व प्रकारात एका महिला रुग्णाला उपचारादरम्यान जीव गमवावा लागला. वीज खंडित झाली असताना उपचार सुरू होते - हा सर्व प्रकार राजस्थानमधील कोटा येथील सर्वात मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयात घडला आहे. वीज गेल्यानंतरही एका वृद्ध महिलेवर उपचार सुरू होते. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने महिलेची प्रकृती बिघडू लागली. तेथे उपस्थित डॉक्टरांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाखाली त्यांच्यावर उपचार केले, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. नंदूबाई (रा. रावतभाटा) असे मृत महिलेचे नाव आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हे वाचा - मुंबईतील युवकाने गाठला कळस; छत्तीसगडला जात FB फ्रेंडसोबत धक्कादायक कृत्य पर्यायी व्यवस्था नव्हती? साधारणपणे रुग्णालयांमध्ये वीज खंडित झाल्यानंतर प्रशासनाकडून 24 तास पर्यायी व्यवस्था केली जाते. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्रास सहन करावा लागू नये, पण कोटा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये अशी व्यवस्था नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. वीज गेल्यानं काही काळ व्हेंटिलेटरचा बॅकअप सुरू होता. पण त्यानंतर तो बॅकअपही संपला. यात रुग्णालय प्रशासनाने अन्य व्यवस्था करणे आवश्यक मानले नाही. मात्र, रुग्णालय प्रशासन चूक मान्य करायला तयार नाही. हे वाचा - भारताने 18 वर्षांनंतर तोडला पाकिस्तानचा हा वर्ल्ड रेकॉर्ड; गिनीज बुकमध्ये नोंद जास्त एसी चालवल्यामुळे लोड एकाच लाईनवर - रुग्णालय तयार झाले तेव्हा सर्व वॉर्डांमध्ये एसीची संख्या कमी असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे होते. पण आता हळूहळू त्याची संख्या वाढत गेली. त्याचवेळी जुनी लाईन असल्याने त्याचा भारही वाढला. त्यामुळे भारनियमन वाढल्याने लाइन जळाली. हॉस्पिटलमध्ये पर्यायी व्यवस्था असल्याचे हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.सी.एस. सुशील सांगतात. मात्र लाइन जळाल्याने जनरेटरही सुरू होऊ शकला नाही.