JOIN US
मराठी बातम्या / देश / म्हणे दुष्ट आत्म्यांच्या भीतीने गावकऱ्यांनी स्वत:ला घरात केले बंद; पोलीस आले आणि मग...

म्हणे दुष्ट आत्म्यांच्या भीतीने गावकऱ्यांनी स्वत:ला घरात केले बंद; पोलीस आले आणि मग...

आंध्र प्रदेशातील एका गावातील लोकांनी दुष्ट आत्म्यांच्या (evils) भीतीने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. (evils fearing in citizens)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 23 एप्रिल : आंध्र प्रदेशातील एका गावातील लोकांनी दुष्ट आत्म्यांच्या (evils) भीतीने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. (evils fearing in citizens) ही घटना श्रीकाकुलम जिल्ह्यातील सरुबुज्जीली गावातील आहे. काय आहे नेमकी घटना? दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी गावकऱ्यांना पुन्हा अशाप्रकारचे निर्णय न घेण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. श्रीकाकुलम पोलीस अधीक्षक जीआर राधिका यांनी सांगितले की,  ‘गाव दुष्ट आत्म्यांनी वेढले असल्याने 17 ते 25 एप्रिलपर्यंत गाव बंद ठेवण्याचा आणि घराबाहेर न पडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. गावकऱ्यांनी दोन दिवस काही विधी करून स्वतःला गावात कोंडून घेतले. विधी पार पडेपर्यंत त्यांनी गाव सोडले नाही. पोलीस गावात आल्यानंतर लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. हेही वाचा -  Buldhana Accident: साखरपुड्याला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, बस आणि कारमध्ये भीषण अपघात, तिघांचा मृत्यू एएनआयने श्रीनू या गावकऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, दुष्ट आत्म्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी गावकऱ्यांनी स्वत:ला तेथे कोंडून घेतले होते. श्रीनू म्हणाले की, त्यांचे पूर्वज विधी करत होते आणि गेल्या दोन दशकांपासून सर्व काही ठीक चालले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांत गावातील प्रमुखासह पाच जणांचा अचानक मृत्यू झाला आहे. यामुळे गावकरी घाबरल्यामुळे ते जादुगरनीकडे गेले. यावेळी तिने दावा केला की, हे गाव आता सुरक्षित राहिले नाही आहे. यामुळे लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले.  

गावातील आणखी एक रहिवासी पार्थसारथी याने एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी गावाला बंद करुन टाकण्यात आले होते. दरम्यान, गावातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना आरोग्याची कोणतीही समस्या नव्हती, असा दावा आणखी एका ग्रामस्थाने केला आहे. दर गावकऱ्यांना आता शाळा आणि पंचायत उघडण्यास मनवण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या