JOIN US
मराठी बातम्या / देश / नवरात्रात घडला चमत्कार, कोरोना काळातली सगळ्यात दिलासादायक बातमी

नवरात्रात घडला चमत्कार, कोरोना काळातली सगळ्यात दिलासादायक बातमी

Coronavirus in India: गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने(Health Ministry) दिली आहे.

जाहिरात

सर्व देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या आला कमी होत आहे. सलग गेल्या महिनाभरापासून आलेख उतरणीला लागला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 27 ऑक्टोबर: सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा (Coronavirus in India) आलेख घसरणीला लागला आहे. गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने(Health Ministry) दिली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली आहे. हे सर्व दिवस हे नवरात्रातले होते. त्यामुळे या काळात संख्या घसरणीला लागणे ही दिलासादायक बाब मानली जाते. देशाचा Recovery Rate हा 90.62वर गेला आहे. देशातल्या उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 78 टक्के रुग्ण हे 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तमिलनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ आणि तेलंगानाचा समावेश आहे. यात महाराष्ट्रात 21.52 टक्के, केरल 15, कर्नाटक 12.05, पश्चिम बंगाल 5.94 तमिलनाडू 4.68, आंध्र प्रदेश 4.60, उत्तर प्रदेश 4.26, दिल्ली 4.12, छत्तीसगढ 3.53  तेलंगाना 2.86 टक्के एवढ्या रुग्णांचा समावेश आहे. आता क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारत वापरू शकणार अमेरिकेचा डेटा, लष्कराला बळ गेल्या 24 तासांमध्ये 58 टक्के मृत्यू हे 5 राज्यांमध्ये झाले आहेत. त्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगढ आणि कर्नाटकचा समावेश आहे. या आधी 1 लाख रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी 57 दिवस लागत होते आता 13 दिवसांमध्ये 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. BIG NEWS: Unlock 5.0ची मुदत 30 नोव्हेंपर्यंत वाढली, जाणून घ्या नवे नियम 23 ते 29 स्पटेंबरच्या दरम्यान रोज सरासरी 83,232 नवे रुग्ण सापडत होते. 21 ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान ही संख्या 49,909 हजारांवर गेली अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19चे 49.4 टक्के रुग्ण हे केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीतून आले आहेत. भारतातला कोविड-19 चा रिकव्हरी रेट सप्टेंबर महिन्यात 76.94  होता तो आता 90.62 टक्क्यांवर गेला आहे. भारतात कोविडचा मृत्यूदर हा 1 सप्टेंबरला 1.77 होता तो आता 1.50 टक्के एवढा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या