JOIN US
मराठी बातम्या / देश / तामिळनाडूत भाजपाची फजिती! प्रचार व्हिडीओमध्ये वापरला Congress नेत्याच्या सुनेचा फोटो

तामिळनाडूत भाजपाची फजिती! प्रचार व्हिडीओमध्ये वापरला Congress नेत्याच्या सुनेचा फोटो

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार (Tamil Nadu assembly elections 2021) सध्या रंगात आला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपला मोठी नामुश्की सहन करावी लागली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 31 मार्च : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार (Tamil Nadu assembly elections 2021) सध्या रंगात आला आहे. भारतीय जनता पक्षानं (BJP) या निवडणुकीत शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील मंगळवारी पार पडली. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपला मोठी नामुश्की सहन करावी लागली आहे. तामिळनाडू भाजपानं प्रचाराचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये  काँग्रेस नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांची सून आणि कार्ती चिदंबरम यांची पत्नी श्रीनिधी चिदंबरम यांना महिला कलाकार म्हणून दाखवलं आहे. हा व्हिडीओ प्रदर्शित होताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर भाजपाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ काढून टाकला आहे. श्रीनिधी चिदंबरम या मेडिकल क्षेत्राशी संबंधित असून उत्तम कलाकार देखील आहेत. भाजपाच्या प्रचार व्हिडीओमध्ये तामिळनाडूतील संस्कृतीचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये श्रीनिधी चिदंबरम यांना भरतनाट्य करताना दाखवलं आहे. इतकंच नाही, तर जे गाणं या व्हिडीओमध्ये वापरण्यात आलं आहे, ते गाणं तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी लिहिलेलं आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीत भाजप आणि द्रमुक आमने-सामने आहेत. त्यामुळे या व्हिडीओवरुन भाजपाला सोशल मीडियावर (Social media) प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या टीकेनंतर भाजपाने हा व्हिडीओ काढून टाकला आहे.

संबंधित बातम्या

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी देखील या मुद्यावरुन भाजपावर टीका केली आहे. भाजपाने श्रीनिधी यांचा व्हिडीओ परवानगी न घेता वापरला आहे. तामिळनाडूच्या विकासासाठी भाजपाकडे कोणतंही व्हिजन नाही हेच त्यांच्या प्रचार व्हिडीओतून स्पष्ट होतं, अशी टीका चिदंबरम यांनी केली आहे. ( वाचा :  ‘राहुल गांधींपासून मुलींनी सावध राहावं’, माजी खासदाराची जीभ घसरली  ) तामिळनाडूतील सर्व विधानसभा मतदारसंघात 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाची सत्तारुढ अण्णा द्रमुक पक्षाशी युती आहे. तर काँग्रेसनं प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकशी आघाडी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या