JOIN US
मराठी बातम्या / देश / सरकारला वीज विकणाऱ्या भारतातील गावाची 'स्मार्ट व्हिलेज' बनण्याची रंजक कहाणी

सरकारला वीज विकणाऱ्या भारतातील गावाची 'स्मार्ट व्हिलेज' बनण्याची रंजक कहाणी

ओदंथुराई गाव Odanthurai Village) केवळ स्वतःसाठीच वीज निर्माण करत नाही तर तामिळनाडू वीज मंडळाला (Tamil Nadu Electricity Board) वीज विकते. मात्र, हे सर्व एका रात्रीत शक्य झाले नाही. यामागे ग्रामस्थांची वर्षानुवर्षे मेहनत आहे. ग्रामपंचायतीने कल्याणकारी योजनांची योग्य अंमलबजावणी केल्यामुळे आज हे गाव स्वावलंबी बनले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोईम्बतूर, 22 फेब्रुवारी : तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील मेट्टापलायम तालुक्यात असलेले ओदंथुराई गाव (Odanthurai Village)  हे केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वोत्तम स्मार्ट गावांपैकी (Smart Village) एक आहे. ओदंथुराई हे गरीब पायाभूत सुविधा, योग्य शौचालयांचा अभाव, वीज खंडित आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची कमतरता असलेल्या इतर कोणत्याही भारतीय गावाप्रमाणेच होते. या गावाच्या बदलाची सुरुवात 1996 मध्ये झाली जेव्हा आर. शनमुगम (R. Shanugam)  पंचायत अध्यक्ष झाले. षणमुगम यांनी सरकारने दिलेला निधी ग्रामीण विकासासाठी योग्य प्रकारे वापरला जाईल, यासाठी प्रयत्न केले. असे केले स्मार्ट गाव काँक्रीट घरे, स्वच्छ पाणी, शौचालये, वीज, रस्ते इत्यादी गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे शनमुगम यांचे मुख्य ध्येय होते. या मूलभूत गरजांवर काम केल्यानंतर, शनमुगम यांच्याकडे पंचायत बचतीमध्ये 40 लाख रुपये शिल्लक होते. उरलेले पैसे वापरून पवनचक्की उभारण्याचा त्यांनी विचार केला. पवनचक्कीची किंमत दीड कोटी होती. उर्वरित रकमेसाठी शनमुगम यांनी कर्ज घेऊन पवनचक्की उभारली. 2017 मध्ये संपूर्ण कर्जाची परतफेड झाली आणि आता गाव तामिळनाडू वीज मंडळाला वीज विकून नफा कमवत आहे. हे गाव तामिळनाडू वीज मंडळापासून पूर्णपणे स्वतंत्र आहे. येथे 25 टक्के वीज सौर पॅनेलमधून आणि उर्वरित पवनचक्क्यांमधून मिळते. ओदंथुराईला स्मार्ट व्हिलेज का म्हटले जाते? येथे कोणीही बेघर नाही. सर्व गावकऱ्यांचे स्वतःचे घर आहे. ग्रामपंचायतीने गावकरी आणि काही आदिवासींसाठी 850 घरे बांधली आहेत. एवढेच नाही तर उघड्यावर कोणीही शौच करत नाही असे हे भारतातील पहिले गाव ठरले आहे. येथील प्रत्येक घरात स्वच्छतागृह आहे. तसेच कर भरण्यात ग्रामस्थही मागे नाहीत. VIDEO : ‘हा देश आता पाकिस्तान झालाय, हिंदूंनी निघून जा’; मुस्लीम वकिलाची धमकी योजनांची योग्य अंमलबजावणी येथील ग्रामपंचायतीमार्फत शासकीय योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली जाते. वैयक्तिक विकास आराखडा, प्रत्येक कुटुंबाला स्वावलंबी बनवण्यासाठी गुरे दिली जातात. दूधविक्रीसाठी ग्रामपंचायतीने दूध विभाग एवनशी करारही केला आहे. शुद्ध पाण्याबद्दल बोलायचे झाले तर 1999 साली गावात जलशुद्धीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली, ज्याद्वारे प्रत्येक गावकऱ्याला पिण्याचे शुद्ध पाणी अखंडपणे पुरवले जाते. ग्रामस्थ जबाबदार केवळ ग्रामपंचायतच नाही तर येथे राहणारे लोकही आपल्या गावाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत. येथील चमकणारे रस्ते याचे साक्षीदार आहेत. रस्त्यावर कोणीही कचरा टाकत नाही. येथे उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन करण्यात आले आहे. लोक नेमून दिलेल्या ठिकाणीच कचरा टाकतात. त्यामुळेच हे गाव दुसऱ्या गावांसाठी आदर्श आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या