जबलपूर, 7 ऑक्टोबर : गायींमध्येदेखील सरोगसीचा प्रयोग यशस्वी (Successful experiment of surrogacy in cows) केला जाऊ शकतो, हे एका विद्यापीठातील प्रयोगातून सिद्ध झालं आहे. जबलपूरच्या नानाजी देशमुख विद्यापीठानं ही कमाल केली आहे. गायींमधील उत्कृष्ट जातींची संख्या (To grow good brides in cows) वाढावी आणि अधिकाधिक दुग्धोत्पादन व्हावं, या उद्देशानं प्रयोगाची सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यावरील गायींवर प्रयोग रस्त्यावर फिरणाऱ्या आणि गोशाळेत आणून सोडलेल्या काही गायींवर वैज्ञानिकांनी प्रयोग केले आहेत. यातील अनेक गायींवर हा प्रयोग यशस्वी झाला असून त्या गर्भवती झाल्याची माहिती विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दिली आहे. रस्त्यावरील आणि गोशाळेतील गायींच्या गर्भाचा वापर करून जगभरातील उत्कृष्ट दर्जाच्या आणि जातीच्या गायींना जन्माला घालता येऊ शकतं, असा दावा विद्यापीठानं केला आहे. या प्रयोगामुळे भटक्या गायींची मागणी वाढणार असल्याचमुळं त्यांचं आपोआपच संरक्षण होईल, असं दावा वैज्ञानिक करत आहेत. अशी होते सरोगसी या प्रक्रियेत बैलाचं चांगल्या दर्जाचं सीमेन घेऊन ते अधिक दूध देणाऱ्या गायींच्या गर्भाशयात सोडण्यात येतं. गायीच्या पोटात भ्रूण परिपक्व झाल्यानंतर तो बाहेर काढण्यात येतो आणि सरोगेट गायींच्या गर्भाशयात सोडला जातो. सरोगेट गायींच्या पोटात या गर्भाची वाढ होते आणि त्यातून मूळ आईच्या जातीचं वासरू जन्माला येतं. हे वाचा - दादा, तुम्ही करून दाखवलंत! चिपी विमानतळ उद्घाटनावरून भाजपची पोस्टरबाजी 30 गायींवर प्रयोग आतापर्यत 30 गायींवर सरोगसीचा प्रयोग करण्यात आला आहे. या सर्व गायींवर शास्त्रज्ञ स्वतः लक्ष ठेऊन आहेत आणि त्यांच्या पालनपोषणाची काळजी घेत आहेत. आतापर्यंत 30 पैकी 15 गायी गर्भवती झाल्या आहेत. या महिनाअखेर चांगल्या जातीच्या गायींना जन्माला घालण्याचा हा प्रयोग प्रत्यक्षात साकार होईल, अशी अपेक्षा आहे. हा प्रयोग आतापर्यंत यशस्वी झाला असून सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे.