JOIN US
मराठी बातम्या / देश / MP News : भुंकणाऱ्या कुत्र्याला हाकललं, कुत्र्याच्या मालकाने उचललं धक्कादायक पाऊल

MP News : भुंकणाऱ्या कुत्र्याला हाकललं, कुत्र्याच्या मालकाने उचललं धक्कादायक पाऊल

चमकिया सोलंकी एका लग्नाला गेले होते. तेथून ते आपल्या घरी परतत होते.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अलीराजपूर (मध्यप्रदेश), 6 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या (Crime News) घटना घडत आहेत. यातच आता मध्यप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी भागातील अलीराजपूर (Alirajpur) येथे एका वृद्धाची हत्या (Murder) करण्यात आली. हत्येचे कारण वाचून तुम्हाला आश्चर्य होईल. मध्य प्रदेशातील अलिराजपूर या आदिवासी भागात एका वृद्धाची हत्या करण्यात आली. भुंकणाऱ्या कुत्र्याला हाकलून लावल्यामुळे ही हत्या करण्यात आली. कुत्र्याला हाकलल्यामुळे त्याच्या मालकाला याचा प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्याने वृद्धाचा खून केला. तर या घटनेनंतर मृताच्या परिवाराने आरोपीचे घर जाळून टाकले. यानंतर परिसरातील वाढलेला तणाव पाहता इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नेमकं काय घडलं? ही घटना मध्यप्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्याच्या सोंडवा ठाणे परिसरातील आहे. 5 जूनला रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. चमकिया सोलंकी असे मृताचे नाव आहे. मृत व्यक्ती आली गाव येथील रहिवासी होती. ते 70 वर्षांचे होते. चमकिया सोलंकी एका लग्नाला गेले होते. तेथून ते आपल्या घरी परतत होते. यानंतर रस्त्यात एक कुत्रा त्यांच्यावर भुंकू लागला. यानंतर त्यांचा चावा घ्यायला त्यांच्या अंगावर येऊ लागला. यामुळे वृद्ध व्यक्तीने आपल्या बचावासाठी त्याला हाकलून लावायचा प्रयत्न केला. हेही वाचा -  Aurangabad Crime : बहिणीला सतत मारहाण, दारुडा भावोजीसोबत मेहुण्याने केलं ‘हे’ विकृत कृत्य कुत्र्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याचे पाहून कुत्र्याचा मालक पान सिंह याला प्रचंड राग आला. याच रागाच्या भरात त्याने एका धारदार शस्त्राने चमकिया सोलंकी याच्यावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर याठिकाणी प्रचंड तणावाचे वातावरण झाले होते. मृताच्या परिवाराने आरोपीचे घराला आग लावून टाकली. याठिकाणी वाढलेला तणाव पाहता, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर आरोपी पान सिंह याला अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या