अलेपुझा : दक्षिण भारतातील ओनम हा एक मोठा सण आहे. या सणानिमित्ताने होड्यांची शर्यत देखील अनेक ठिकाणी होते. ती पाहण्यासाठी खूप लांबून लोक येत असतात. या सणाला गालबोट लागलं आहे. शर्यती दरम्यान बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील चेन्नीथला परिसरात होड्यांच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी निघालेल्या बोटवर काळानं घाला घातला. ही होडी उलटली आणि मोठी दुर्घटना घडली. हेही वाचा- विसर्जन करताना चूक पडली महाग, 15 लोकांनी गमवावा लागला जीव
हे वाचा-बाप्पाला निरोप देताना मोठी दुर्घटना; यवतमाळमध्ये दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू या बोटीमध्ये १२ वीचा विद्यार्थी देखील होता. होडी उलटली आणि लोक बुडाले. यामध्ये १२ वीच्या विद्यार्थ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोकाकुल वातावरण आहे.