JOIN US
मराठी बातम्या / देश / Shivsena Symbol Crisis : शिवसेना आणि शिंदे गटाला 'ही' पक्षचिन्ह मिळण्याची शक्यता

Shivsena Symbol Crisis : शिवसेना आणि शिंदे गटाला 'ही' पक्षचिन्ह मिळण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना आणि शिंदे गटाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये तीन पैकी दोन निवडणूक चिन्ह हे एक सारखे असल्याचे समोर आले आहे.

जाहिरात

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना आणि शिंदे गटाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये तीन पैकी दोन निवडणूक चिन्ह हे एक सारखे असल्याचे समोर आले आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता पक्षचिन्ह मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे.  शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला गदा मिळण्याची शक्यता आहे. आता निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेली मुदत संपली. दोन्ही गटांनी निवडणूक चिन्ह आणि नावांवरती तीन पर्यायाचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना आणि शिंदे गटाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये तीन पैकी दोन निवडणूक चिन्ह हे एक सारखे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पसंती क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर देण्यात आलेल्या दोन्ही गटांच्या पर्यायांचा विचार केंद्रीय निवडणूक आयोग करत या असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला गदा मिळण्याची शक्यता आहे

 ( ‘56 वर्षात कोणालाही जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं’, सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा ‘बाण’ )

शिवसेनेकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि तिसरा धगधगती मशाल हे 3 चिन्ह पाठवली आहे. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे  अशी  नावं सेनेनं निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. पण,  उगवता सूर्य आणि त्रिशूळ दोन्ही चिन्ह नाकारली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग दोन्ही चिन्ह नाकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Shivsena Symbol Crisis : शिवसेनेच्या नव्या चिन्हाच्या मार्गातही शिंदे गटाचा खोडा, निवडणूक आयोग ‘ते’ चिन्हं नाकारणार?) शिंदे  गटाकडून सुद्धा उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन्ही चिन्हांवर दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे एकाच वेळी जर एकाच चिन्हावर दोन्ही गटाने दावा केला तर चिन्ह बाद केले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिंदे गटाकडून तीन नावं सुद्धा ठरली आहे.  बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या