JOIN US
मराठी बातम्या / देश / 6 दिवसांपासून समुद्रात अडकले होते 7 भारतीय, Indian Navyने असा वाचवला जीव, वाचा थरारक प्रसंग

6 दिवसांपासून समुद्रात अडकले होते 7 भारतीय, Indian Navyने असा वाचवला जीव, वाचा थरारक प्रसंग

3700 टनची आयएनएस तलवार इंडियन नेव्हीतील महत्त्वाचं जहाज मानलं जातं. या जहाजाने पुन्हा एक ऑपरेशन यशस्वी केलं आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ओमानच्या खाडीत इंडियन नेव्हीने एका अशा जहाजाची मदत केली आहे, जे अनेक तासांपर्यंत अडचणीत होता. इंडियन नेव्हीने बस एका कॉलवर या कार्गाे शीप (Indian Cargo Ship) एमवी नयनच्या मदतीसाठी हात पुढे केले. ओमानच्या खाडीत तैनात भारताच्या वॉरशिप आयएमएस (Warship INS Talwar) तलवारने या जहाजाच्या मदतीसाठी पुढे आले. या जहाजावर 7 भारतीय प्रवास करीत होते. काय आहे संपूर्ण आणि या रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. जहाजातील अनेक उपकरण झाले होते खराब मर्चेंट नेव्हीच्या जहाज एमवी नयनकडून वॉपशिप आयएनएस तलवारवर तैनात क्रूजजवळ एक ब्रॉडकास्ट कॉल आला होता. ही कार्गो शीप ओमानच्या मार्गाने इराक जात होती आणि जहाजात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना मदत हवी होती 9 मार्चपासून हे जहाज समुद्रात अडकलं होतं आणि अचानक जहाज लाटांवर स्वार होऊ लागलं. असं घडण्यामागे तीन कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे जहाजातील इंजिनात बिघाड होणे, पॉवर जनरेशन यंत्रातील गडबड किंवा नेव्हिगेशन उपकरणांमध्ये तांत्रिक फॉल्ट आदी कारणं असल्याची शक्यता आहे. नौसेनेकडून सांगितलं गेलं की, एमवी नयनवर सुरुवातीला केलेल्या सर्वेनंतर आयएनएस तलवारकडून आपली VBSS म्हणजेच व्हिजिट, बोर्ड, सर्च अँड सीजर टीमला रवाना करण्यात आलं होतं. यासोबतच एक तांत्रिक टीमही नयनसाठी रवाना झाली होती. 7 तासांपर्यंत नेव्हीची टीम करीत होती प्रयत्न इंडियन नेव्हीनुसार नौसेनाच्या टीमने सातत्याने 7 तासांपर्यंत उपकरणांना ऑपरेशनलाइज करण्यासाठी काम केलं, यासोबतच जनरेटर्स, स्टिअरिंग पंप, सीवॉटर पंप, कंप्रेसर आणि मेन इंजन ठीक करण्यात आली. यानंतर एमवी नयन पुन्हा सेलिंगसाठी तयार करण्यात आला. नेव्हीच्या टीमने एमवी नयनवर जीपीएस आणि नेव्हिगेशन लाइट्सदेखील दुरुस्त केलं. जर नौसेना योग्य वेळेत तेथे आली नसती तर कार्गो जहाज पुढील बंदरावर रवाना होऊ शकलं नसतं. हे ही वाचा- भरसमुद्रात बोटीवर धगधगत होत्या आगीच्या ज्वाला; पाहा थरारक VIDEO आयएमएस तलवार, इंडियन नेव्हीमधील तलवार क्लास फ्रिगेटमध्ये टॉप क्लासची फ्रिगेट मानली जाते. ही रशियाने तयार केली होती आणि 18 जून 2003 मध्ये ही नेव्हीत आणण्यात आली होती. तलवारने अनेक ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे. या फ्रिगेटला सोमालियाच्या तटांवरुन पायरेसी संपवण्यासाठी मास्टर मानलं जातं. ही एक गायडेड मिसाइल फ्रिगेट आहे. 3700 टनची आयएनएस तलवार इंडियन नेव्हीतील महत्त्वाचं जहाज मानलं जातं. आयएनएस तलवार समुद्रात 300 नॉट्स म्हणजे 55 किलोमीटर प्रति ताशीच्या वेगाने जाऊ शकते. यामध्ये अनेक शस्त्रास्त्रांचा साठाही आहे. याचे सेंसर्ग जगातील सर्वात चांगले मानले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या