तिरुअनंतपुरम 31 जुलै : आजकाल सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मात्र, याचे काही वाईट परिणामही आहेत. आपल्याला काहीही नवीन गोष्ट किंवा पदार्थ बनवायचा असला तरी आपण तो मोबाईलवर सर्च करतो. मात्र, अनेकदा हे जीवघेणंही ठरू शकतं. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात 12 वर्षाच्या एका मुलाने Youtube व्हिडिओ पाहून दारू (Wine) बनवली आणि आपल्या शाळेतील मित्रांना पिण्यासाठी दिली. दोन घोट पिताच त्याच्या मित्राला उल्टी व्हायला लागली आणि चक्करही येऊ लागली. यानंतर या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना केरळच्या तिरुअनंतपुरम येथील आहे. विरारमध्ये रात्रीच्या अंधारात बापानेच 3 वर्षाच्या मुलाला खड्ड्यात पुरलं; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी एका सरकारी शाळेत घडली. पोलिसांच्या चौकशीत दारू बनवणाऱ्या विद्यार्थ्याने मान्य केलं की त्याच्या पालकांनी द्राक्षे विकत आणले होते. त्या द्राक्षांचा वापर करून त्याने वाईन बनवली. अल्पवयीन मुलाने सांगितलं की, त्याने दारू बनवण्यासाठी स्पिरीट किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलचा वापर केला नाही. युट्यूब व्हिडिओनुसार त्याने दारू एका बाटलीत भरली आणि जमिनीखाली पुरली. पोलिसांनी सांगितलं की मुलाच्या आईला माहिती होतं की तो दारू बनवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु तिने ते गांभीर्याने घेतलं नाही. सध्या पोलिसांनी बाटलीतील दारूचे नमुने गोळा करून न्यायालयाच्या परवानगीने रासायनिक तपासणीसाठी पाठवले आहेत. गर्लफ्रेंड म्हणाली, तुझ्या सुसाइडची बातमी TV वर दाखव; प्रियकराने केलं मान्य अन्… पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की जर तपासात मुलाने दारूमध्ये स्पिरिट किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल मिसळले होते असं समोर आलं, तर त्याच्याविरुद्ध बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. पोलिसांनी मुलाच्या पालकांना आणि शाळेच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर परिणामांची माहिती दिली आहे.