JOIN US
मराठी बातम्या / देश / नितीन गडकरींच्या भेटीमुळे मनसे-भाजप युती होईल का? संजय राऊत म्हणाले...

नितीन गडकरींच्या भेटीमुळे मनसे-भाजप युती होईल का? संजय राऊत म्हणाले...

‘मुंबई महानगरपालिकेचा भगवा झेंडा कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले महाराष्ट्राविरूद्ध, मराठी मानसाविरूद्ध किती कटकारस्थान केले तरी

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी शिवसेनेवर टीका केल्यामुळे भाजप आणि मनसे युतीची चर्चा रंगली आहे. पण, मनसे आणि भाजपची युती होणार का यावर फारसं बोलावं असं काही नाही. ‘रात गई बात गई’ अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप आणि मनसे युतीची चर्चा फेटाळून लावली. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चेला जोर आला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजप-मनसे युतीवर भाष्य केलं. नितिन गडकरी यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अशा भेटीगाठी होत असतात. प्रत्येक भेटी मागे राजकारण असतं असं नाही. यावर बोलावं असं काही नाही. आमच्यासोबतही इतर नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. मनसे आणि भाजपची युती होणार का? यावर फारसं बोलावं असं काही नाही. ‘रात गई बात गई’,  मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, संभाजीनगर महानगरपालिका, संभाजीनगर महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासह सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीने लढेल आणि जिंकेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. ( अक्षर पटेलने परदेशी खेळाडूला शिकवला ‘बल्ब उतारो डान्स’, पाहा VIDEO ) ‘मुंबई महानगरपालिकेचा भगवा झेंडा कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले महाराष्ट्राविरूद्ध, मराठी मानसाविरूद्ध किती कटकारस्थान केले तरी कारस्थानच्या छाताडावर उभं राहून मुंबई महापालिका जिंकू, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही किती षड्यंत्र रचा, असं आव्हानच राऊत यांनी दिलं. ‘शरद पवार यांच्या सक्रीय सहभागाशिवाय विरोधकांच्या एकजूटीचं पाऊल पुढं जाणार नाही. शरद पवार यांच्या मनात काय आहे हे आम्ही समजू शकतो. शरद पवार यांच्या प्रयत्नाशिवाय या देशामध्ये  विरोधी पक्षांची एकजूट आणि मोदींना पर्याय निर्माण होऊ शकत नाही, असंही संजय राऊत म्हणाले. ( heatstroke death : उन्हात फिरू नका! राज्यात उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू ) चंद्रकांत पाटील म्हणाले की, मतदारांच्या मागे Ed लागू शकते. कोल्हापूर उत्तरमध्येच कशाला गोव्यामध्ये पणजी मतदारसंघ, साखळी या मतदार संघामधील मतदारांची अगोदर ED चौकशी लावा,चंद्रकांत दादा पाटीलांनी फार चांगली सूचना केली आहे. चंद्रकांत दादा याचं हे वक्तव्य फार इन्टरेस्टींग आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी जर यात पुढाकार घेतला तर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून या लढाईत त्यांच्याबरोबर उभा राहील, असा टोला राऊत यांनी पाटील यांना लगावला. ‘कोणती कोणाची काय टीम आहे. कोणी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे. तोंडाच्या कोणत्या वाफा दौडायच्या. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मीरिटमध्ये आली म्हणून शिवसेना मीरिटमध्ये आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्री करतो आहे. याचा अर्थ शिवसेनेला राजकारण  चांगलं कळतं. मुख्यमंत्रांना राज्यातील जनतेचा पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सलग तीन वेळा देशातील  टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले आहेत. हे जर कोणाला कळत नसेल तर त्यांचा नंबर राजकारणात ठ पेक्षा खाली मानावा लागेल’, असं म्हणत राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या