Indo-Tibetan Border Police
नवी दिल्ली, 26 जानेवारी: आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) जल्लोषात मग्न आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत आहे, हे वर्ष देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे केले जात आहे. दरम्यान, 15000 फूट उंचीवर मायनस 40 डिग्रीत जवानांनी तिरंगा फडकवला आणि भारत माता की जय ! म्हणत भारतीय आर्मीच्या जवानांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसंग कोणताही असो, सीमेवर आपल्या संरक्षणासाठी सतत उभा असलेल्या आपल्या जवानांचा सार्थ अभिमान वाटतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या(Indo-Tibetan Border Police ) जवानांनी लडाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं.
तर हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.
10 ते 12 डिग्री तापमानातही आपले हात काम करणं बंद करतात. पण उणे 40 डिग्री तापमानालं हे ध्वजारोहन अभिमानाने उर भरुन आणणारे आहे. आयटीबीपीने ध्वजारोहनाचे फोटो शेअर केले आहेत. परिस्थिती कोणतीही असो, जवानांचा उत्साह यामधून दिसून येत आहे.