आकाश अंबानी
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र आणि जिओ या भारतातल्या सर्वांत मोठ्या टेलिकॉम कंपनीचे प्रमुख आकाश अंबानी यांचं नाव प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या जगातल्या उदयाला येत असलेल्या ताऱ्यांमध्ये समाविष्ट झालं आहे. Time100 Next या 100 जणांच्या यादीत आकाश अंबानी यांचा समावेश झाला आहे. या यादीत समाविष्ट झालेले आकाश अंबानी एकमेव भारतीय उद्योगपती आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त आम्रपाली गण या जन्माने भारतीय असलेल्या अमेरिकन बिझनेस लीडरचाही या यादीत समावेश आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ‘सीएनबीसी टीव्ही 18’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ‘भारतातल्या प्रतिष्ठित उद्योजक घराण्यात जन्मलेले आकाश अंबानी उद्योगविश्वात भरारी घेतील, हे अपेक्षितच होतं; मात्र ते कष्ट घेत असल्याचं दिसत आहे,’ असे गौरवोद्गार ‘टाइम’ मॅगझिनने त्यांच्याबद्दल काढले आहेत. 30 वर्षांच्या आकाश अंबानी यांची जून महिन्यात जिओच्या अध्यक्षपदी बढती करण्यात आली. वयाच्या 22व्या वर्षीच त्यांना कंपनीच्या मंडळावर घेण्यात आलं होतं. जिओ ही भारतातली सर्वांत मोठी टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपनी असून, कंपनीची ग्राहकसंख्या 426 दशलक्ष एवढी प्रचंड आहे. 5G Launch in India: प्रतीक्षा संपली! मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला 5G सेवेचा शुभारंभ, ‘या’ शहरांत सर्वप्रथम सेवा ‘22व्या वर्षी ते कंपनीत आल्यापासून गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांमधून आपल्या कंपनीत काही अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे,’ असं ‘टाइम’ने म्हटलं आहे. ‘टाइम’च्या या यादीत अशा 100 उदयोन्मुख व्यक्तींचा समावेश आहे, ज्या व्यक्ती बिझनेस, मनोरंजन, खेळ, राजकारण, आरोग्य, शास्त्र आणि चळवळ आदींच्या भविष्याला आकार देत आहेत. अमेरिकी गायक SZA, अभिनेत्री सिडनी स्विनी, बास्केटबॉलपटू जा मोरंट, स्पॅनिस टेनिसपटू कार्लोस अल्काराझ, अभिनेता आणि टीव्ही पर्सनॅलिटी केके पामर, पर्यावरणविषयक कार्यकर्ती फार्विझा फरहान आदींचाही या यादीत समावेश आहे. ओन्लीफॅन्स या कंटेंट क्रिएटर्स साइटच्या सीईओ म्हणून अलीकडेच आम्रपाली गण यांची नियुक्ती करण्यात आली. त्या जन्माने भारतीय असून, अमेरिकी उद्योजक आहेत. सप्टेंबर 2020मध्ये मुख्य मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून त्या या कंपनीत रुजू झाल्या होत्या. ही साइट प्रामुख्याने पोर्नोग्राफी तयार करणाऱ्या सेक्स वर्कर्सकडून कंटेंट क्रिएशनसाठी वापरली जाते. दिवाळीआधी 5G चा मोठा धमाका, सर्वात मोठा विक्रम करणार ‘आम्रपाली यांच्या नेतृत्वाखाली ओन्लीफॅन्स कंपनीने सेफ्टी आणि ट्रान्स्परन्सी सेंटर सुरू केलं असून, त्या प्लॅटफॉर्मची लोकप्रियता खूप वाढीला लागली आहे,’ असं ‘टाइम’ने आम्रपाली यांच्याबद्दल म्हटलं आहे.