JOIN US
मराठी बातम्या / देश / रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट तीन पट महागले, तर मुंबईत... ‘हे’ आहे कारण

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट तीन पट महागले, तर मुंबईत... ‘हे’ आहे कारण

नातेवाईक किंवा मित्र मंडळींना सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्याचा तुमचा प्लॅन असेल तर आधी तीनदा विचार करा. कारण, रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) तीन पट वाढवले आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मार्च : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) बंद झालेली रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटांची (Platform Ticket) सुविधा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.  प्लॅटफॉर्म तिकिटं मिळणार असल्यानं नातेवाईक किंवा मित्र मंडळींना सोडण्यासाठी रेल्वेच्या दारापर्यंत जाण्याचा तुमचा प्लॅन असेल तर आधी तीनदा विचार करा. कारण, रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट तीन पट वाढवले आहे. रेल्वेनं याबाबतची नवी अधिसूचना (notification) जारी केली असून यामध्ये हा दर 10 रुपयांवरुन थेट 30 रुपये करण्यात आला आहे. काय आहे कारण? सतत वाढणाऱ्या महागाईनं त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला थेट फटका बसणारा हा निर्णय का घेण्यात आला? याचं स्पष्टीकरण रेल्वेनं दिलं आहे. कोरोना व्हायरसनंतर बदललेल्या परिस्थितीमध्ये रेल्वे स्टेशनवरील गर्दी नियंत्रित करणे ही विभागीय रेल्वे मॅनेजर (DRM) यांची जबाबदारी आहे. प्लॅटफॉर्मवरील वाढती गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करताना लोकं विचार करतील आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनमध्ये फार गर्दी होणार नाही, अशी रेल्वे प्रशासनाला आशा आहे. हा एक तात्पुरता निर्णय आहे, असं देखील रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केले आहे. मुंबईत पाच वाढ मध्य रेल्वेनं (Central Railway) मुंबई महानगर प्राधिकरण विभागातील (MMRDA) काही प्लॅटफॉर्मवरील तिकीट दर पाच पट वाढवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रात त्यातही मुंबईमध्ये या रुग्णांची संख्या मोठी आहे. दररोज तीनशे पर्यंत खालावलेली कॉरोना रुग्णाची संख्या आता हजाराच्या वर जाऊ लागलेली आहे. गुरुवारी दिवसभरात 1104 रुग्ण सापडले. राज्यात 24 तासांत 8998 नवे कोरोनारुग्ण दाखल झाले असून 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  कोरोनाचा धोका वाढल्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दी रोखण्यासाठी मुंबईतील काही रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट पाच पट वाढवण्यात आले आहे. (  दहा दिवसात 35 जिल्ह्यांमध्ये दुप्पट झाला कोरोनाचा प्रसार, मृत्यूचा आकडाही वाढला ) यापूर्वी गेल्या वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली होती. फक्त रेल्वेनं प्रवास करणाऱ्या व्यक्तींनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जात होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या