नवी दिल्ली 18 जून : केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’ला भारतातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे लोण आता दक्षिण भारतामध्येही पसरले आहे (Agnipath Scheme Protest). रेल्वे सेवेलाही याचा मोठा फटका बसला आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी ट्रेन पेटवल्या आहेत (Trains Set on Fire by Protesters). एकीकडे काही लोक रेल्वेचं मोठं नुकसान करत असताना दुसरीकडे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या मदतीसाठी पुढे येणारे अनेक लोकही आहेत. नुकतंच बिहारमधील गया येथे असंच दृश्य पाहायला मिळालं. ज्यात एका रेल्वे कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले. Agnipath Scheme : 4 वर्षानंतर काय करणार अग्निवीर? गृहमंत्रालयानं तयार केला खास प्लॅन अग्निपथ योजनेच्या विरोधादरम्यान, ट्विटरवर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो या कठीण काळातही आशा देतो की आजही देशात असे लोक आहेत ज्यांना या देशाचं आणि देशवासीयांचं भलं करायचं आहे. हा व्हिडिओ खास आहे कारण यामध्ये एक रेल्वे कर्मचारी जीवाची पर्वा न करता ट्रेनचे डबे वेगळे करताना दिसतो, जेणेकरून पुढच्या बोगीतील आग मागील डब्यांपर्यंत पोहोचू नये.
ट्विटर यूजर उत्कर्ष सिंह यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक रेल्वे कर्मचारी ट्रेनच्या दोन बोगींमध्ये उभा राहून त्या एकमेकांपासून वेगळ्या करताना दिसत आहे. तो ज्या बोगीमध्ये उभा आहे त्यातील एका बोगीला आग लागली आहे. जीवाची पर्वा न करता तो घाईघाईने बोगी वेगळी करताना दिसतो. बोगी वेगळी केल्यानंतर ही आग इतर बोगींपर्यंत पोहोचू नये म्हणून हा कर्मचारी ट्रेनच्या डब्याला आग लागण्यापासून वाचवण्यासाठी प्रवासी आणि इतर लोकांच्या मदतीने ट्रेनच्या डब्याला पुढे ढकलताना दिसतो. उत्कर्षने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं- “आश्चर्यकारक… ही देशसेवा आहे! गयामध्ये आंदोलकांनी ट्रेन पेटवली. प्रथम रेल्वे कर्मचाऱ्यानी जीव धोक्यात घालून बोगी वेगळ्या केल्या आणि नंतर आग इतर डब्यांमध्ये पसरू नये म्हणून लोकांनी धक्का देत बोगी पुढे ढकलली. Agnipath Scheme Protest: देशभरातील विरोधानंतरही भारतीय सेना ठाम, 2 दिवसांमध्ये सुरू होणार प्रक्रिया हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 20 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आंदोलकांनी आग लावण्याच्या कृत्याचं समर्थन करताना एका व्यक्तीने लिहिलं – “रेल्वे कर्मचाऱ्यांचं पोट भरलेलं होतं. ज्यांचं पोट रिकामं होतं त्यांनी आग लावली. प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं." आणखी एकाने लिहिलं, “ज्यांनी बोगी वेगळी केली आणि नंतर ती पुढे ढकलली, त्या लोकांनी सैन्यात भरती व्हायला पाहिजे. हे लोक सैन्यात भरती होण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. त्यांच्यात निर्भयता, माणुसकी आणि एकत्र काम करण्याची क्षमता आहे.”