JOIN US
मराठी बातम्या / देश / Qutub Minar controversy: कुतुबमिनारच्या मशिदीत मिळणार पूजेला परवानगी? ज्ञानवापीनंतरच्या वादावर कोर्टाने काय सांगितलं?

Qutub Minar controversy: कुतुबमिनारच्या मशिदीत मिळणार पूजेला परवानगी? ज्ञानवापीनंतरच्या वादावर कोर्टाने काय सांगितलं?

कुतुबुद्दीन ऐबक याने 27 मंदिरं उद्ध्वस्त करून कुव्वत उल इस्लाम या मशिदीची स्थापना केली, असा हिंदू संघटनांचा दावा आहे. पण पुरातत्त्व खात्याने काय म्हटलंय आणि त्यावर कोर्टाचा काय निकाल? ज्ञानवापी मशिदीनंतर नव्याने उफाळलेल्या Qutub Minar Masjid वादाबद्दल Latest Updates..

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 24 मे: सध्या देशभरात मंदिर आणि मशिदींचा (Mandir Masjid controversy ) मुद्दा गाजत असतानाच, दिल्लीमधल्या कुतुबमिनार कॉम्प्लेक्समधल्या मशिदींचा (Qutub Minar Controversy) वादही न्यायालयात पोहोचला आहे. या ठिकाणी कुव्वत उल इस्लाम आणि मुगद अशा दोन मशिदी आहेत. यातल्या कुव्वत उल इस्लाम मशिदीत देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. सोबतच या ठिकाणी पूजा (Pooja in Qutub Minar) करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही हिंदू संघटनांनी केली आहे. या प्रकरणी आज (24 मे 2022) दिल्लीच्या साकेत न्यायालयात सुनावणी (Qutub Minar Mosque hearing) पार पडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आज संपला असून, न्यायालयाने निकाल राखून ठेववा आहे. 9 जूनला हा निकाल जाहीर करण्यात येईल. हिंदू पक्षाचं म्हणणं काय? हिंदू संघटनांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे, की कुतुबुद्दीन ऐबक याने 27 मंदिरं उद्ध्वस्त करून कुव्वत उल इस्लाम या मशिदीची स्थापना केली. त्या ठिकाणी पूर्वी मंदिरंच होती, याचे पुरावे कुतुबमिनारच्या परिसरात (Temple in Qutub Minar) आहेत. श्री गणेश, विष्णू आणि यक्षांसह इतरही देवतांशी संबंधित आकार (Ganesh idol in Qutub Minar Mosque) इथल्या दगडांमध्ये कोरलेले आहेत. सोबतच, 1600 वर्षांपूर्वीचा एक लोखंडी खांबही या ठिकाणी आहे. या स्तंभावर संस्कृत श्लोक लिहिले आहेत. या मशिदीत मुस्लिमांनी कधीही नमाज पढला नाही, याचे स्पष्ट पुरावे असल्याचं हरिशंकर जैन या वकिलांनी म्हटलं आहे. या ठिकाणी मंदिर उभारण्याची आमची मागणी नाही. केवळ पूजा करण्याची परवानगी द्यावी, असं जैन म्हणाले. पूजा करणं हा मूलभूत अधिकार अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश निखिल चोप्रा यांनी या वेळी याचिकाकर्त्यांना त्यांची मुख्य मागणी विचारली. सोबतच, गेल्या 800 वर्षांपासून या ठिकाणी कसलीही पूजा झाली नाही वा नमाज पढला गेला नाही, तर तसंच पुढेही सुरू ठेवण्यात यावं असे निरीक्षणही नोंदवलं.

 वाचा - पुण्यात राहून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात, ATSने मुसक्या आवळल्या, तरुणाची रवानगी कोठडीत

 त्यावर जैन म्हणाले, की संविधानाच्या 25 व्या कलमानुसार, मला स्वतःच्या धार्मिक पद्धतीने पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे पूजा करण्यापासून अडवणं हे माझ्या अधिकारांचं हनन आहे. त्यामुळे न्यायालयाने या ठिकाणी पूजेच्या परवानगीसाठी एएसआयला (ASI) आदेश द्यावेत, एवढीच आमची मागणी आहे, असं जैन (Hari Shankar Jain) यांनी कोर्टात म्हटलं आहे.

पुरातत्त्व खात्याचं (ASI) म्हणणं काय? भारतीय पुरातत्त्व खात्याने (ASI) कुतुबमिनार हे एक राष्ट्रीय स्मारक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे नियमांनुसार अशा वास्तूंवर कोणीही मूलभूत हक्क सांगू शकत नाही. तसंच त्या ठिकाणाची संरचनाही बदलता येत नाही. अशा स्मारकांमध्ये कोणत्याही प्रकारची पूजा वा धार्मिक प्रार्थना करता येत नाही. त्यामुळे ही याचिका रद्द करण्यात यावी, असा युक्तिवाद एएसआयचे वकील सुभाष गुप्ता यांनी केला. मशिदीच्या निर्मितीसाठी मंदिरांमधल्या दगडांचा वापर केल्यामुळेच या ठिकाणी देवतांच्या मूर्ती आहेत; मात्र ही मंदिरं पाडण्यात आली होती का, याबाबत पुरावे नसल्याचं एएसआयने म्हटलं आहे. मंदिरांचे अवशेष आहेत, पण मंदिरं पाडल्याचा पुरावा नाही जेव्हा कुतुबमिनारला स्मारकाचा दर्जा देण्यात आला होता, तेव्हा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पूजा-प्रार्थना केली जात नव्हती. नियमांनुसार, स्मारकाचा दर्जा देताना ही वास्तू ज्या स्वरूपात होती, त्याच स्वरूपात ती पुढे राहणं आवश्यक आहे.

हे वाचा - आश्चर्य! आश्रमात सापडलं तब्बल 150 वर्षांपूर्वीचं तूप; सुगंध, ताजेपणा आजही कायम

संबंधित बातम्या

 त्यामुळे तेव्हा या ठिकाणी पूजा होत नव्हती, तर आतादेखील पूजेसाठी परवानगी देण्यात येऊ नये.

मशिदीत पढला जात नाही नमाज कुतुबमिनार कॉम्प्लेक्समधल्या मुघल मशिदीचे इमाम मौलाना शेर मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीतल्या भिंतींवर हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे या ठिकाणी कधीच नमाज पढला जात नाही. ही मशीद एखाद्या पडक्या जागेप्रमाणे आहे. मुघल मशीद प्रकरण याच परिसरात असणाऱ्या मुघल मशिदीमध्ये बऱ्याच काळापासून नमाज पढला जात होती; मात्र 13 मे 2022 पासून याठिकाणी नमाज पढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हिंदू संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर ही बंदी लागू करण्यात आली असल्याचा आरोप मशिदीचे इमाम मौलाना शेअर मोहम्मद यांनी केला आहे. या विरोधात आपण कायदेशीर पावलं उचलणार असल्याचं दिल्ली वक्फ बोर्डाचे चेअरमन अमानतुल्ला खान यांनी म्हटलं आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वाद कधी झाला सुरू कुतुबमिनार हा कुतुबुद्दीन ऐबकने नव्हे, तर राजा विक्रमादित्य यांनी बांधला होता असा दावा एएसआयचे माजी प्रादेशिक संचालक धरमवीर शर्मा (Dharamveir Sharma) यांनी केला होता. सूर्याच्या दिशेच्या अभ्यास करण्यासाठी हा मिनार बांधला गेल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर या सर्व वादाला सुरुवात झाली. यातच राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण विजय (Tarun Vijay) यांनी कुव्वत उल इस्लाम मशिदीत सापडलेल्या दोन गणेश मूर्ती संकुलाबाहेर हलवण्याची विनंती करणारं पत्र एएसआयला लिहिलं. ही त्या मूर्तींची योग्य जागा नसून, त्या ठिकाणी त्यांचा अनादर होत आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. दरम्यान, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय दिल्लीतल्या कुतुबमिनार संकुलात सापडलेल्या हिंदू आणि जैन मूर्तींची आयकनॉग्राफी करण्याच्या विचारात आहे. अर्थात, इथे उत्खनन किंवा तिथली कोणतीही धार्मिक पद्धती थांबवण्याचा विचार सध्या नसल्याचं एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं. तिथली कोणतीही मूर्ती कुठेही हलवण्याचा विचार सध्या सुरू नाही. यातल्या काही मूर्तींना नाव देऊन त्या प्रदर्शनासाठी खुल्या करण्याचा विचार आम्ही करत आहोत, असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. या सर्व प्रकरणी साकेत कोर्ट नेमका काय निकाल देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या