JOIN US
मराठी बातम्या / देश / भ्रष्टाचाराच्या आरोपात IAS ऑफिसरला अटक, मुलाची हत्या केल्याचा पोलिसांवर आरोप

भ्रष्टाचाराच्या आरोपात IAS ऑफिसरला अटक, मुलाची हत्या केल्याचा पोलिसांवर आरोप

भ्रष्टाचाराच्या आरोपात अटकेत असलेले पंजाबचे IAS ऑफिसर संजय पोपालीच्या (Sanjay Popli) 27 वर्षांच्या मुलाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जून : भ्रष्टाचाराच्या आरोपात अटकेत असलेले पंजाबचे IAS ऑफिसर संजय पोपाली (Sanjay Popli) यांच्या 27 वर्षाच्या मुलाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. संजय पोपलीला शनिवारी अटक करण्यात आली. त्याच्या घरातून 12 किलो सोने, 3 किलो चांदी, 4 आयफोन आणि 2 सॅमसंगचे स्मार्ट वॉच जप्त करण्यात आलेत आहेत. दुसरिकडं संजयचा मुलगा कार्तिक पोपलीचा गोळी लागून मृत्यू झाला. ‘दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यानं त्याची हत्या केली,’ असा आरोप आएएस अधिकारी संजय पोपलीनं केलाय. कार्तिकच्या नातेवाईकांनीही या प्रकरणात दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप  केले आहेत. दक्षता विभागाचे अधिकारी घरी दाखल झाले त्यावेळी कार्तिक तिथं उपस्थित होता. त्यांनी त्याची हत्या केली. आता आमच्यावर खोटी साक्ष देण्यासाठी दबाव टाकला जात आहे,’ असा आरोप कार्तिकच्या आईनं केला आहे. या प्रकरणात आपण कोर्टात जाणार असून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केलीय.

कार्तिकच्या आईनं सांगितलं की, ‘संजयला कोर्टात सादर केलं जाणार होतं.दक्षता विभागाच्या टीमनं त्यांना घरी येऊन धमकावले. त्या टीममधील काही जण कार्तिकला वरच्या मजल्यावरील खोलीत घेऊन गेले. मी वर गेले तेव्हा ते मुलाचा मानसिक छळ करत होते. आमचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत.’ पोपली परिवारच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनंही दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. कार्तिक पोपलीला त्यांनी काही तास ताब्यात ठेवल्याचा आरोपही या महिलेनं केलाय. Datting aap वरील गर्लफ्रेंडवर बँक मॅनेजर फिदा, 5.7 कोटी केले ट्रान्सफर! दक्षता विभागानं हे आरोप फेटाळले आहेत. कार्तिकनं आत्महत्या केल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दक्षता विभागाची टीम घरी पोहचली तेव्हा कार्तिकनं वडिलांच्या बंदुकीतून स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली, असा दावा एसएसपी कुलदीप चहल यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या