चंडीगड, 10 मार्च : पंजाब विधानसभा निवडणूक लढणाऱ्या (Punjab Assembly Election Results) अनेक दिग्गज नेत्यांचा अत्यंत वाईट पराभव झाला आहे. पंजाबच्या राजकारणातील (Punjab Politics) मोठ मोठी नावंदेखील या निवडणुकीत काहीच कमाल करू शकली नाही. अनुभवी नेत्यांना नव्या तरुण नेत्यांकडून अपयश पत्करावं लागलं. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी असतील वा माजी सीएम कॅप्टन अमरिंदर सिंह यानाही अपयश पत्करावं लागलं. प्रकाश सिंग बादल, सुखबीर बादल आणि नवजोत सिंह सिद्धू सारख्या नेत्यांनाही आपली जागा वाचवता आली नाही. सर्वात आधी बोलूया आम आदमी पक्षाचे उमेदवार जगदीप कंबोजबद्दल. त्यांनी जलालाबाद जागा शिअदचे अध्यक्ष सुखबीर बादल यांचा (Sukhbir Singh Badal) पराभव केला. जगदीप कंबोजचं वय 37 वर्षे आहे. त्यांची शेती आणि व्यवसाय आहे. जगदीर कंबोज यांचं पदवीपर्यंत शिक्षण झालं असून त्यांची एकूण संपत्ती 3.2 कोटी आहे. ज्यातील 36.7 चल आणि 2.9 अचल संपत्ती आहे. त्यांची एकूण घोषित केलेलं उत्पन्न 7 लाख रुपये असून त्यातील 3.2 लाख रुपये स्वत:च उत्पन्न आहे. तर दुसरीकजे प्रकाश सिंह बादल (Prakash Singh Badal) यांना गुरमीत सिंह खुडिया यांनी हरवलं. आम आदमी पार्टीने या जागेवरुन दिवंगत खासदार जगदेव सिंग खुदिया यांचा मुलगा गुरमीत सिंग खुदिया यांना उमेदवारी दिली होती. पार्टीच्या अक्षेपेवर सिद्ध होत त्यांनी बादल यांचा गड जिंकला. खुदिया गेल्या वर्षी जुलै महिन्यात आपमध्ये सामील झाले होते. त्याचं कुटुंबीय दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनात सक्रिय होते. मोबाइलच्या दुकानावर काम करणाऱ्याने पंजाबच्या सीएमला हरवलं.. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे आपल्या दोन्ही जागा वाचवू शकले नाही. भदोर जागावेर आप उमेदवार लाभ सिंग यांनी आणि श्री चमकोर साहेब सीटवर आप उमेदवार डॉ. चरणजीत सिंह विजयी झाले. भदोर सीट हरवणारे लाभ सिंग ( Labh Singh Ugoke) एका मोबाइल रिपेयरिंग दुकानात नोकरी करतात. त्यांची आई सरकारी शाळेत सफाई कर्मचारी आहे आणि त्यांचे वडील शेतात मजुरी करतात. पंजाब निवडणुकीत हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. हे ही वाचा- शेजारचं राज्य असतानाही शिवसेना-राष्ट्रवादीला जे जमलं नाही ते ‘आप’ने करुन दाखवलं अमरिंदर सिंग यांना कोहलींनी हरवलं.. आम आदमी पक्षाकडून अकाली दलाच्या माजी महापौर आणि माजी अकाली मंत्री सुरजी सिंग कोहली यांचा मुलगा अजीतपाल सिंग कोहली यांनी पंजाबचे दिग्गज नेते कॅप्नट अमरिंदर सिंग यांना हरवलं. पतियाळा हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा गड मानला जातो. पहिल्यांदा त्यांना आपल्याच गडात हार पत्करावी लागली. जीवन ज्योती कौरने दोन दिग्गजांना हरवलं… अमृतसर ईस्ट (Amritsar East) जागेवरुन आम आदमी पार्टीच्या जीवन ज्योत कौर यांनी 6750 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि शिरोमणि अकाली दलाचे बिक्रम सिंह मजीठिया यांना हरवलं आहे. अमृतसर ईस्ट (Amritsar East Assembly Seat) पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्वात हाय प्राफोइल सीटपैकी एक आहे.