येताना फक्त एक किंवा दोन वेण्या घालून यावे. जर एखाद्या विद्यार्थिनीचे केस जर मोकळे आढळून आले तर तिला आतामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
बिहार, 22 ऑगस्ट : एकीकडे तालिबान्यांनी (talibani) अफगाणिस्तान (afghanistan) ताब्यात घेतल्यामुळे सर्वत्र तालिबानी राजवटीची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे बिहारमधील (bihar) भागलपूर (bhagalpur) येथील महिला कॉलेजमध्ये काढण्यात आलेल्या आदेशामुळे वाद निर्माण झाला आहे. या आदेशानुसार, विद्यार्थिनींना मोकळे केस (loose hair ban) ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थिंनी विरोध केला असून हा प्रकार म्हणजे, तालिबानी शरिया कायद्यासारखा आहे, असा संताप व्यक्त केला आहे. बिहारमधील भागलपूर येथील एकमेव ‘सुंदरवती महिला महाविद्यालय’ (एसएम कॉलेज)मध्ये (sundarvati womens college bhagalpur bihar) हा प्रकार घडला आहे. विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. रमन सिन्हा यांनी हा आदेश काढला आहे, असं वृत्त आजतक ने दिलं आहे. इंटर कॉलेजमध्ये हा ड्रेस कोड 2021-23 सत्रातील विद्यार्थिंनींना लागू केला आहे. यामध्ये कडक आदेश देण्यात आले आहे. कॉलेजमध्ये मोकळे केस ठेवून येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. येताना फक्त एक किंवा दोन वेण्या घालून यावे. जर एखाद्या विद्यार्थिनीचे केस जर मोकळे आढळून आले तर तिला आतामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसंच कॉलेजच्या परिसरात सेल्फी काढू नये, असंही बजावलं आहे. एवढंच नाहीतर ड्रेस कोडबद्दल सुद्धा विद्यार्थिनींना अनेक नियम लागू केले आहे. Corona Up्date : तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा, रोज सापडणार 4 लाख रुग्ण - निती आयोग एसएम कॉलेजमध्ये बारावी वर्गात शिकणारे जवळपास 155 विद्यार्थिनी आहे. यात सर्व विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील आहे. प्राचार्यांनी याबद्दल एक समिती स्थापन केली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या समितीने रॉयल ब्लू कुर्ती, सफेद सलवार, सफेद दुपट्टा, सफेद सॉक्स, काळे बूट आणि केसांची एक किंवा दोन वेण्या अशी अट घातली आहे. जर थंडीचा महिना असेल तर रॉयल ब्लू ब्लेजर परिधान करण्यास परवानगी दिली आहे. या नव्या नियमापैंकी ड्रेस कोड व्यतिरिक्त इतर नियमांवर विद्यार्थिनींची तयारी आहे. पण वेण्या घालण्याबद्दल विद्यार्थिनींमध्ये कमालीची नाराजी आहे. काही विद्यार्थिनींनी याचे स्वागत केले आहे. एवढंच नाहीतर एका विद्यार्थिनी कॉलेजचे आभारच व्यक्त केले आहे. Alert! फोनमधून डिलीट करा हे 8 Apps, Googleकडूनही बॅन; 4500 युजर्सला आर्थिक फटका कॉलेज प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थिनींनी विरोध दर्शवत निदर्शनं केली आहे. एसएम कॉलेजच नाहीतर इतर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी सुद्धा विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. कॉलेज प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे, तालिबानी शरिया कायद्या सारखा आहे. विद्यार्थिनींनी कॉलेजमध्ये दोन वेण्या घालून येणे ही अट कॉलेज प्रशासनाच्या अज्ञानी मानसिकतेचं दर्शन देत आहे. याबद्दल विद्यापीठांच्या कुलगुरूकडे तक्रार करणार असल्याचं राजद शिक्षण संघटनेचे अध्यक्ष दिलीप कुमार यादव यांनी सांगितलं.