लखनऊ, 7 मार्च : उत्तर प्रदेशात आज सातव्या आणि शेवटच्य टप्प्यातील मतदान आज पार पडलं. निवडणुकीचा निकाल येत्या गुरुवारी म्हणजेच 10 मार्चला समोर येणार आहे. पण त्याआधी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. रिपब्लिक टीव्हीने दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार युपीत काँग्रेसच्या पदरात पुन्हा अपयशच आलं आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या युपीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सपशेल फेल ठरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रियंका यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले. रोड शो घेतले, रॅली घेतल्या, घराघरात पोहोचल्या. पण योगी-मोदींचा जलवा कमी करण्यात त्यांना अखेर अपयश आल्याचं चित्र आहे. रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला यावेळी उत्तर प्रदेशात केवळ 3 ते 8 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 7 जागांवर यश मिळालं होतं. या निवडणुकीतही काँग्रेसला तितक्याच जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं एक्झिट पोलची सध्याची आकडेवारी सांगत आहेत. उत्तर प्रदेशात 403 जागांच्या विधानसभेसाठी मतदारांनी कौल दिला आहे. याचा निकाल गुरुवारी (Assembly Election Result 2022 date)10 मार्चला लागेल. एकूण 7 टप्प्यात मतदान झालं. त्यापैकी अखेरच्या टप्प्यातलं मतदान 7 मार्चला मतदान यंत्रात बंदिस्त झालं आणि Exit Polls चा कल यायला सुरुवात झाली. उत्तर प्रदेश रिपब्लिक संस्थेचा एक्झिट पोल : भाजपला 262 ते 277 जागांवर यश मिळण्याची शक्यता समाजवादी पक्षाला 119 ते 134 जागांवर यश मिळण्याची शक्यता बहुजन समाज पक्षाला 7 ते 15 जागांवर यश मिळण्याची शक्यता काँग्रेसला 3 ते 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता इतर 2 ते 6 ‘न्यूज एक्स’च्या एक्झिट पोलची आकडेवारी : भाजप - 211 ते 225 सपा - 146 ते 160 बसपा - 14 ते 24 काँग्रेस - 4 ते 6 इतर - 0 Tv9 भारतवर्षचा एक्झिट पोल : भाजप : 211-225 सपा : 146-160 बसपा - 14-24 काँग्रेस - 4-6 इतर - 0 हेही पाहा : तुम्ही आमच्या ShareChat च्या अधिकृत पेजवरुनही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल संदर्भातील विविध अपडेट वाचू शक ता देशभरातील उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. उत्तर प्रदेशात आज सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या पाच राज्यांचे निकाल दोन दिवसांनंतर म्हणजेच येत्या गुरुवारी 10 मार्चला समोर येणार आहेत. येत्या गुरुवारी मतमोजणी होणार आहे. पण त्याआधी या पाच राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. विशेष म्हणजे कोरोना संकटानंतरची या देशातील सर्वात मोठ्या निवडणुका होत्या. संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकांकडे आहे. विशेषत: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे देशासह जगभरातील भारतीयांचं लक्ष लागलं आहे. त्याला कारणही अगदी तसंच साजेसं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्र पक्षांसोबत तिथे एकहाती सत्ता मिळवली होती. पण गेल्या तीन ते चार वर्षात उत्तर प्रदेशात घडलेल्या अनेक घटना पाहता यावेळी भाजप पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होते का? की समाजवादी पक्षाची सायकल जलत गतीला धावून भाव खाऊन जाते, याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. ( पंजाबमध्ये सर्व पक्षांवर ‘झाडू’; इंडिया टुडेच्या Exit Polls मधून आली मोठी बातमी ) या निवडणुकीत भाजप आणि समाजवादी पक्षाला बहुमत मिळालं नाही तर बहुजन समाजवादी पक्ष, एमआयएम यांना जास्त महत्त्व प्राप्त होऊ शकतं, असा अंदाज वर्तवला जात होता. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस मुसंडी मारतं की पुन्हा पदरात निराशा पडते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. याशिवाय महाराष्ट्रात सत्तेत असलेला शिवसेना पक्षाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत नेमकं कितपत यश येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं होतं. आता या निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे.