JOIN US
मराठी बातम्या / देश / PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा, रेल्वे नेटवर्कशी जोडला गेला Statue of Unity

PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा, रेल्वे नेटवर्कशी जोडला गेला Statue of Unity

Statue Of Unity Trains: या गाड्या गुजरातमधील केवडियाला वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगरशील जोडल्या जातील

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केवडिया (Gujrat) याठिकाणी असणाऱ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (Statue of Unity) ला भेट देणं सुलभ व्हावं याकरता देशातील विविध भागातून केवडियामध्यये आठ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. या गाड्या केवडियाला वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगरला जोडतील. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की देशाच्या आणि रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे की अशा प्रकारच्या गाड्यांना एकत्र हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे आदर्श पू्र्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी काही स्टेशनच्या नव्या इमारतींचे देखील उद्घाटन केले. या नव्या स्थानकांचे फोटो देखील नरेंद्र मोदी यांनी फोटो शेअर केले होते.

गुजरातमधील रेल्वे संबंधित प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल देखील उपस्थित होते. पीएमओकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या रेल्वे स्थानकांमध्ये स्थानिक वैशिष्ट्ये आणि आधुनिक प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत. केवडिया हे ग्रीन बिल्डिंगचे प्रमाणपत्र असलेले देशातील पहिले स्टेशन आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या