JOIN US
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधी पक्षावर टीका; म्हणाले...'2.5 कोटी लोकांनी लस घेतली, पण ताप आला एका पक्षाला

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधी पक्षावर टीका; म्हणाले...'2.5 कोटी लोकांनी लस घेतली, पण ताप आला एका पक्षाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 18 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing)डॉक्टर (Doctor), आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या 71 व्या वाढदिवसाच्या (Birthday) निमित्ताने भारतात कोविड लसीची (Corona Vaccination) विक्रमी नोंद करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 18 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing)डॉक्टर (Doctor), आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी देशभरातील डॉक्टर आणि कोरोना योद्धांना त्यांच्या प्रयत्नांसाठी अभिनंदन केलं आहे. यावेळी पीएम मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस (Congress) नेत्यांवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवर निशाणा साधला आणि म्हटलं की, एका दिवसात 2.5 कोटींहून अधिक लसीकरणानंतर, कोविड -19 लसींचा दुष्परिणाम म्हणून तापाबद्दल चर्चा होत आहे.

संबंधित बातम्या

शनिवारी गोव्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान, पीएम मोदींनी उपस्थित असलेल्या डॉक्टरांना टोमणा मारण्याच्या स्वरात विचारलं की, ‘काल अडीच कोटी लोकांना लस मिळाली, मग एका पक्षाला ताप का आला?’ हे ऐकून डॉक्टरही हसले. हेही वाचा-  PAK vs NZ : न्यूझीलंडनं दौरा का सोडला? रावळपिंडीच्या मैदानातील धक्कादायक VIDEO VIRAL गोव्यातील 100 टक्के लोकसंख्येला कोविड -19 प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिल्याने आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण लाभार्थ्यांशी संवाद साधताना मोदींनी ही मिश्किलपणे टीका केली आहे. पीएम मोदी म्हणाले, आम्ही ऐकलं आहे की जेव्हा लसीकरण होतं, जो लस घेतो, 100 पैकी फक्त एकाला थोडीसा त्रास होतो, ताप येतो… आणि असेही म्हटलं जातं की जर जास्त ताप असेल तर मानसिक संतुलन देखील निघून जाते. मी हे पहिल्यादांच बघतोय की 2.5 कोटीपेक्षा जास्त लोकांना लस मिळाली आणि काल रात्री 12 नंतर एका राजकीय पक्षाची प्रतिक्रिया आली. त्याचा ताप वाढला. याला काही तर्क असू शकेल का? हेही वाचा-   बंगळुरुमध्येही ‘बुराडी’, एकाच कुटुंबातील 5 जणांचे आढळले मृतदेह शुक्रवारी काँग्रेसच्या भारतीय युवा काँग्रेसनं पंतप्रधानांचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ आणि महिला शाखा अखिल भारतीय महिला काँग्रेसने ‘महागाई दिवस’ म्हणून साजरा केला. काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र त्यांच्या सरकारच्या अपयशांचा उल्लेख करत त्यांचा वाढदिवस “बेरोजगारी दिवस”, “शेतकरी विरोधी दिवस”, “कोरोना गैरव्यवस्थापन दिवस” ​​आणि “महागाई दिवस म्हणून साजरा केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या