JOIN US
मराठी बातम्या / देश / राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग; तीन राज्याच्या आमदारांनी दिला धोका

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग; तीन राज्याच्या आमदारांनी दिला धोका

या सर्वांनी NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मत दिलं आहे. विशेष म्हणजे बंगालमधील भाजप आमदार फुटण्याची शक्यता आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जुलै : 15 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (15th Presidential Election) क्रॉस वोटिंग झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. गुजरातमध्ये NCP चे आमदार कांधल जडेजा, उत्तर प्रदेशात सपाचे आमदार शिवपाल यादव आणि शहजिल इस्लाम,  ओडिसात काँग्रेसचे आमदार मुकीम यांनी क्रॉस वोटिंग (Cross Voting in15th Presidential Election) केल्याचं सांगितलं जात आहे. या सर्वांनी NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मत दिलं आहे.

या निवडणुकीत एकूण 4800 निर्वाचित खासदार आणि आमदारांनी भाग घेतला. निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या विजयी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यांच्यानिमित्ताने देशात पहिल्यांदा एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसणार आहे. 27 पक्षांच्या समर्थनासह मुर्मू यांना मोठं मतदान होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे सिन्हा यांना 14 दलांचं समर्थन आहे.

बंगालमध्ये भाजपला क्रॉस वोटिंगची भीती… बंगालमध्ये भाजपाने क्रॉस वोटिंग रोखण्यासाठी आधीच आमदारांना कलकत्त्याच्या एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं. यानंतर सर्वांना विधानसभेत आणत वोटिंग करण्यात आलं. पक्षाने शुभेंदु अधिकारी, मनोज तिग्गा आणि स्वपन मजूमदार यांच्यावर क्रॉस वोटिंग रोखण्याची जबाबदारी सोपवली आहे.

संबंधित बातम्या

एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी द्रौपदी मुर्मू  विजयी होतील, असं म्हटलं आहे. भाजप-शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीचे आमदारही त्यांना मतदान करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. पक्षमर्यादा सोडून किंवा पक्षादेश झिडकारून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या