नवी दिल्ली, 1 एप्रिल : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत (Rajnikanth) यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award 2021) जाहीर झाला आहे. अभिनय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर चहुबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘यंदाचा 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कारकर्त्याची निवड करण्यासाठी आशा भोसले, शंकर महादेवन यांच्यासह एकूण 5 जणांची टीम तयार करण्यात आली होती. या समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने महान नायक रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्याची शिफारस केली,’ अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
(ही बातमी अपडेट होत आहे)