नवी दिल्ली, 2 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या वर्षातील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी आज सोमवारी रवाना झाले आहेत (Modi Europe Visit). पंतप्रधान मोदी तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 2 ते 4 मे दरम्यान ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांना भेटी देणार आहेत. कसा असणार मोदींचा दौरा - पंतप्रधान मोदींचा हा या वर्षातील पहिलाच दौरा असणार आहे. आज ते बर्लिन येथे पोहोचतील आणि सर्वात आधी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांची भेट घेतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे बर्लिनमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. यानतंर 3 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडो-नॉर्डिक संमेलनात सहभागी होतील. यानंतर ते डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करतील. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सला भेट देणार आहेत. इथे ते फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील. इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांची नुकत्याच फ्रांसच्या राष्ट्रध्यक्षपदी निवड झाली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यादरम्यान, रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. हेही वाचा - रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना पार्किन्सन? शरीराच्या अनियंत्रित हालचालींमुळे अफवांना उधाण VIDEO मागील दोन महिन्यांपासून रशिया-यूक्रेन युद्ध सुरू आहे (Russia Ukraine War). रशियाने गेल्या 24 तासांत युक्रेनच्या लष्करी तळांवर पुन्हा मोठे हल्ले केले आहेत. (Russia Attack On Ukrain) रशियन सैन्याने क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला करून 17 युक्रेनियन लष्करी तळ नष्ट केले आहेत. याशिवाय, युक्रेनियन सैन्याचे कमांड पोस्ट आणि अन्न गोदामही हल्ल्यात नष्ट झाले. तसेच या हल्ल्यामध्ये युक्रेनचे 200 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. तर युक्रेनियन सैन्याची 23 चिलखती वाहने देखील नष्ट झाल्याची माहिती आहे.
रशियाने डॉल्फिन्सना दिलं खास प्रशिक्षण -
गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने (Russia) युक्रेनवर नव्याने हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, काही उपग्रह छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यामध्ये रशियन नौदलाने आपल्या सुरक्षेसाठी समुद्रातल्या माशांचा वापर केला आहे. काही मासे काळ्या समुद्रात रशियन नौदल तळाचे रक्षण करत आहेत. रशियाने या माशांना विशेष प्रशिक्षण दिलं आहे, जे त्यांना धोका वाटल्यास हल्ला करू शकतात.