JOIN US
मराठी बातम्या / देश / PM Modi Aunt died of Covid-19: पंतप्रधान मोदींच्या काकूचा कोरोनाने मृत्यू; अहमदाबादेत सुरू होते उपचार

PM Modi Aunt died of Covid-19: पंतप्रधान मोदींच्या काकूचा कोरोनाने मृत्यू; अहमदाबादेत सुरू होते उपचार

PM Narendra Modi Aunt died of covid-19 पंतप्रधानांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी नर्मदाबेन यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 27 एप्रिल: नर्मदाबेन मोदी (PM Narendra Modi Aunt died of covid-19)म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूचं कोरोनामुळे निधन झालं. अहमदाबादमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. नर्मदाबेन यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली. नर्मदाबेन मोदी 80 वर्षांच्या होत्या. त्या अहमदाबादमधल्या राणीप भागात मुलांसमवेत राहात असत. त्यांचे पती जगजीवनदास मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वडील दामोदरदास मोदी यांचे सख्खे बंधू होत. जगजीवनदास यांचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं आहे.

संबंधित बातम्या

पंतप्रधानांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी नर्मदाबेन यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. लाखो खर्चूनही कोरोनाने आईबाबाला हिरावलं; कोरोनाग्रस्त चिमुकल्यानेच दिला मुखाग्नी “आमची काकू नर्मदाबेन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले 10 दिवस उपचार घेत होती. कोरोनाच्या संसर्गानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली,” असं प्रल्हाद मोदी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या