उत्तर प्रदेश, 05 मार्च: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly elections) 2022 च्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये दोन दिवसीय दौरा करत आहेत. यादरम्यान त्यांच्या वेगळ्या स्टाइलचा अंदाड समोर आला आहेत. (PM Modi in Varanasi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रोड शो केला. हा रोड शो मालदहिया चौकातून सुरू होऊन कबीरचौरा, लोहटिया, मैदागीन, निचीबाग चौक, बाबा विश्वनाथ धाम, सोनारपुरा, अस्सी घाट मार्गे बीएचयू गेट येथे संपला. पंतप्रधानांचा रोड शो सुमारे 3.1 किलोमीटरचा होता. रोड शो दरम्यान ते अचानक एका मुलीला भेटले आणि तिला आशीर्वाद दिला. पंतप्रधानांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या रोड शो दरम्यान, पीएम मोदींनी बाबा विश्वनाथ मंदिरात पूजेसह उपस्थित पुजाऱ्यांशी संवाद साधला. यानंतर मंदिराबाहेर डमरूही वाजवला. पीएम मोदींनी काशीमध्ये चहापानावरही चर्चा केली. यावेळी पीएम मोदींशी बोलणाऱ्या आणि त्यांच्यासोबत फोटो काढणाऱ्यांची गर्दी झाली होती. मोदींच्या रोड शो दरम्यान पंतप्रधानांनी यावेळी जगप्रसिद्ध बनारसी पानाचा आस्वादही घेतला. यावेळी त्यांनी दुकानदाराची विचारपूसही केली. मोदींनी लंकेच्या प्रसिद्ध दुकानात बनारसी पान खाल्लं.
यावेळी कत्था ऐवजी त्यांनी चुना असलेलं पान खाल्लं. एवढंच काय तर त्यांनी पानाच्या वैशिष्ट्यांची प्रशंसाही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पान खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चहापानाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक नेते पीएम मोदींसोबत दिसले. ज्या दुकानात पीएम मोदींनी सर्वसामान्यांसोबत बसून चहा प्यायले, ते दुकान काशीच्या अस्सी घाट भागातील प्रसिद्ध दुकान आहे. हे दुकान ‘पप्पू की अद्दी’ या नावानं ओळखलं जातं. खार्किवमध्ये विध्वंस..!रशियाचा जिवंत बॉम्ब हातात घेऊन सैनिकांनी पोस्ट केला PHOTO यूपीमध्ये आतापर्यंत सहा टप्प्यात मतदान झालं आहे. या दरम्यान 403 पैकी 349 जागांवर मतदान झालं आहे. यूपीमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 7 मार्चला होणार आहे. सातव्या टप्प्यात काशीचा समावेश असलेल्या राज्यातील 9 जिल्ह्यांतील 54 जागांवर मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 5 मार्चला वाराणसीत येणार आहेत. यादरम्यान ते खजुरी येथे रॅली घेणार असून त्यात वाराणसीच्या सर्व विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनता सहभागी होणार आहे.