ओसाका, 28 जून: जपानमधील ओसाका इथे ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढायला हवं असं आवाहन सर्व देशांना केलं आहे. यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून सर्व देशांनी त्यात सहभागी व्हावं असं मोदींनी आवाहन केलं आहे. दहशतवाद हा संपूर्ण जगाला भेडसावणारा प्रश्न आहे याचा समूळ नाश करायला हवा असंही ते यावेळी म्हणाले.