JOIN US
मराठी बातम्या / देश / केंद्रीय मंत्रिमंडळात 24 मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद; 90 टक्के मंत्री कोट्यधीश, ADR चा अहवाल

केंद्रीय मंत्रिमंडळात 24 मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद; 90 टक्के मंत्री कोट्यधीश, ADR चा अहवाल

Team Modi: या विस्तारानंतर केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या 78 वर पोहोचली आहे. या मंत्र्यांपैकी तब्बल 42 टक्के म्हणजेच 33 मंत्र्यांविरोधात गुन्हे (Crime) दाखल असल्याची माहिती समोर येतेय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जुलै: बुधवारी मोदी (Team Modi) सरकारच्या मंत्रिमंडळाचा **(Cabinet Minister)**पहिला विस्तार पार पडला. या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. या विस्तारानंतर केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या 78 वर पोहोचली आहे. या मंत्र्यांपैकी तब्बल 42 टक्के म्हणजेच 33 मंत्र्यांविरोधात गुन्हे (Crime) दाखल असल्याची माहिती समोर येतेय. त्यात 24 जणांविरोधात हत्या, (Criminal Cases) हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गुन्हे दाखल आहेत. ADR अर्थात Association For Democratic Reforms ने नुकताच यासंदर्भातला अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. एकूण 78 केंद्रीय मंत्र्यांपैकी 33 मंत्र्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. या मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असल्याचं असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालात नमूद आहे. त्यात 24 मंत्र्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्नसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलं आहे. (pm modi 78 cabinet ministers 24 minister criminal cases against them) 35 वर्षीय केंद्रीय गृहराज्यमंत्री निसित प्रामाणिक यांच्या विरोधात भादंविच्या कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही मुरलीधरन या तिघांविरोधातही हत्येचा प्रयत्न केल्याचा (भादंवि 307) गुन्हा दाखल असल्याचं एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्री कोट्यधीश मोदींच्या मंत्रिमंडळातील 78 मंत्र्यांपैकी 70 मंत्री म्हणजेच जवळपास 90 टक्के मंत्री हे कोट्यधीश असल्याचा दावा एडीआरनं अहवालात केला आहे. या दाव्यानुसार मंत्र्यांची प्रत्येकी संपत्ती ही सरासरी 16.24 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर याा मंत्र्यांचा समावेश आहे. या चारही मंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये 50 कोटींहून जास्त संपत्ती असल्याचं नमूद केलं आहे. हेही वाचा-  मोठी बातमी: लस घेतली असेल तरच मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी? 1 कोटीहून कमी संपत्ती असलेले मंत्री 8 मंत्र्यांची संपत्ती ही 1 कोटीपेक्षा कमी असल्याचं एडीआरनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. यामध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांच्या नावे फक्त 6 लाखांची संपत्ती आहे. जॉन बारला यांच्या नावे 14 लाख आणि कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या नावे 24 लाखांची संपत्ती आहे. सुशिक्षित मंत्री 82 टक्के केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण 82 टक्के म्हणजेच 64 मंत्री हे सुशक्षित असल्याचं एडीआरच्या अहवालात म्हटलं आहे. या 64 मंत्र्यांचं शिक्षण पदवी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. 17 मंत्री पदवी, 21 मंत्री पदव्युत्तर तर 9 मंत्री डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलेले आहेत. 8वी ते 12वी दरम्यान शिक्षण घेतलेले 15 टक्के म्हणजेच 12 मंत्री आहेत. एकूण दोन मंत्र्यांनी डिप्लोमा केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या