नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाभोवती (PFI) च्या हस्तकांवर मागच्या काही दिपसांपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एनआयए आणि ईडीने आज (दि.27) देशातील विविध ठिकाणी पुन्हा छापा टाकला आहे. देशभरात काही ठिकाणी छापे टाकले आहेत यामध्ये दिल्लीत कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद, मालेगाव, नांदेड आणि सोलापूरमध्ये छापे टाकले आहे. पहाटेचं तपास यंत्रणेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
पीएफआयशी संबंधित एका प्रकरणात एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. PFI मध्ये सक्रीय सहभागी असलेल्या शाहीन कौसरला अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमने शाहीन कौसरला अटक केली आहे. शाहीन कौसर PFI च्या स्टुडंट विंग / यूथ विंग SDPI शी संबंधित आहे. दिल्लीतील शाहीन बाग परिसरातून अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : PFI संघटनेभोवती फास आवळला, औरंगाबाद, नांदेडमध्ये ATS चे छापे, अनेक जण अटकेत
दिल्लीत झालेल्या सीएए-एनआरसीच्या मुद्द्यावरून शाहीन कौसर त्यावेळी जोरदार चर्चेत होती. अम्मा फाउंडेशनच्या प्रमुख शाहीन कौसरची सध्या चौकशी सुरू आहे. दरम्यान शाहीन कौसर राजकारणात येणार असल्याचे बोलले जात असताना तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तिने याआधी विधानपरिषदेची निवडणूक लढवली होती, पण शाहीनचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार होता.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेनं मोठी मोहीम उघडली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आज औरंगाबाद मध्येही ats ने छापे टाकले आहे. सोमवारी रात्री पासून अनेक ठिकाणी छापे टाकले आहे. काही संशियितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
आज 13 ते 14 पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजूनही शहरात एनआयए आणि एटीएस यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. अजून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : कोल्हापूर पोलीस प्रमुखांनी PFI चा हस्तक मौला मुल्लाविषयी दिली महत्वाची माहिती
दरम्यान, PFI बाबत मोठी बातमी समोर आली आहे. PFI च्या रडारवर RSS आणि BJP चे अनेक मोठे नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र ATS सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे PFI च्या निशाण्यावर नागपुरचा संघ मुख्यालयदेखील आहे.
PFI च्या मोठ्या प्लानचा खुलासा
PFI देशातील मोठे RSS आणि BJP नेत्यांवर हल्ला करण्याचा प्लान आखत होतो, अशीही माहिती सांगितली जात आहे. PFI च्या सदस्यांनी RSS ची दसऱ्याच्या दिवशी होणारी पथ संचालनाची माहिती जमा केली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय एजन्सी NIA , CRPF आणि राज्य ATS ने संपूर्ण देशात 10 राज्यांमध्ये PFI शी संबंधित लोकांवर छापेमारी करीत शेकडो लोकांना अटक केलं होतं.