JOIN US
मराठी बातम्या / देश / कोकोच्या चिंतेत पत्नीने सोडलं जेवणं; हरवलेला पोपट शोधण्यासाठी डॉ. पतीने ठेवलं लाखोंचं बक्षीस

कोकोच्या चिंतेत पत्नीने सोडलं जेवणं; हरवलेला पोपट शोधण्यासाठी डॉ. पतीने ठेवलं लाखोंचं बक्षीस

आजकाल लोक माणसांचा इतका विचार करीत नाही. मात्र हे डॉक्टर दाम्पत्य या मुक्या पक्षासाठी कासावीस झालंय. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर कोको हरवल्याची जाहिरात दिली, याशिवाय ज्याला पोपट सापडले त्याला 1 लाखांचं बक्षीसही जाहीर केलंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 3 फेब्रुवारी: राजस्थानमधील (Rajasthan News) सीकर शहरात पक्षी प्रेमीचं अनोखं प्रकरण समोर आलं आहे. शहरातील प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ. विके जैन यांचा पोपट तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला आहे. यामुळे त्यांच्या पत्नीने जेवण सोडलं आहे. पोपटाला शोधण्यासाठी डॉक्टरांनी लाखो रुपये खर्च केलं. त्यांनी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बेपत्ता पोपटाची जाहिरात दिली आहे. शहरातदेखील अनेक ठिकाणी पोस्टर-पॅम्फलेट वाटले आणि सोशल मीडियावरही मेसेज व्हायरल केला आहे. इतकच नाही तर पोपटाचा शोध घेणाऱ्यांना बक्षीसाची घोषणा केली आहे. डॉ. विके जैन यांनी सांगितलं कि, जर कोणी माझा पोपट शोधला तर त्याला मी एक लाख रुपये देण्यासाठी तयार आहे. कुटुंबातील लोक आणि रुग्णालयातील स्टाफ दिवस-रात्र पोपटाचा शोध घेत आहेत. डॉ. जैन यांची पत्नी डॉ. अर्चना यांनी सांगितलं कि, रुग्णालयाच्या वर त्यांचं घर आहे. तीन दिवसांपूर्वी टॅरेसवर पोपटाला सफरचंद खायला देत होतो, तेव्हा तो उडाला आणि परत आलाच नाही. तीन दिवसांपासून पोपटाचा शोध घेतला जात आहे. अद्याप पोपटाबद्दल काहीच माहिती कळू शकलेली नाही. हे ही वाचा- Air India च्या विमानात ऐकू आला रतन टाटांचा आवाज, म्हणाले… दोन वर्षांपूर्वी 80 हजारात दोन पोपट खरेदी केले होते.. डॉ. जैन यांनी सांगितलं कि, दोन वर्षांपूर्वी राखाडी रंगाचे दोन आफ्रिकन पोपटांची जोडी 80 हजारांना खरेदी केली होती. एका पोपटाचं नाव कोको ठेवलं होतं. दोन वर्षांत कोको घरातील एक सदस्य बनला होता. त्याच्या बेपत्ता झाल्याने घर सुनं झालं आहे. डॉ. जैन यांनी सांगितलं कि, हा पोपट दुर्मिळ प्रजातीचा आहे. तो एक हजारांहून अधिक शब्द बोलतो. सर्वांशी बोलतो. काही विचारलं तर उत्तरही देतो. त्याच्या बेपत्ता झाल्यामुळे सून-मुलगा आणि मुलगी उदास झाली आहे. पत्नी रडत राहते आणि त्याची प्रतीक्षा करते. कोको त्या कुटुंबासोबत इतका मिसळून गेला होता की, जेव्हा घरातील जेवायला बसत तेव्हा तो ही बसत होता. डॉक्टरांनी सांगितलं कि, त्याला सिरिंजने जूस आणि दूध दिलं जात होतं.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या