JOIN US
मराठी बातम्या / देश / माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

बिबट्यानेही शांतपणे राखी बांधून घेतली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत. यादरम्यान राजस्थानमध्ये एक अनोखी घटना पाहायला मिळाली. येथे एका महिलेने चक्क बिबट्याला राखी बांधल्याची घटना घडली. विशेष म्हणजे बिबट्यानेही शांतपणे राखी बांधून घेतली. त्याने महिलेवर हल्ला केला नाही. भावांना राखी बांधायला माहेरी जात होती तेव्हा… ही घटना राजसमंद जिल्ह्यातील आहे. खेडा गावातील महिला लिला आपल्या पतीसह गाडीवरुन माहेरी जात होती. यादरम्यान रस्त्यात तिला एक जखमी बिबट्या चालताना दिसला. तिने पतीला गाडी रोखण्यास सांगितलं. पतीने गाडी थांबवताच ती महिला बिबट्याच्या जवळ गेली. आणि त्याच्या पायावर राखी बांधली. महिलेने याचा एक व्हिडीओही केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यादरम्यान बिबट्याने महिलेवर हल्ला केला नाही.

संबंधित बातम्या

बिबट्या काही कारणास्तव जखमी झाला होता. तो गावाच्या दिशेने जात होता. ज्यानंतर लोक त्याचा व्हिडीओ शूट करू लागले. महिलेने बिबट्याला राखी बांधल्यानंतर तेथील काहींनी याबाबत वन विभागाला कळवलं. तब्बल 2 तासांनंतर वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचले. आणि बिबट्याला उपचारासाठी सोबत घेऊन गेले. भावाच्या रक्षणासाठी दोघी बहिणींनी बनवली स्मार्ट राखी; भाऊ अडचणीत असतील तेव्हा वाजणार अलार्म येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राजसमंद जिल्ह्यातील घटदाट जंगलात अनेक बिबटे आहेत. टेरिटोरियल भांडतान बिबट्या जखमी झाल्याची शक्यता आहे. जो रस्ता भटकला आणि गावाच्या दिशेने जाऊ लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या