अलीगढ: रेल्वे रुळ ओलांडून जात असताना सायकल रिक्षाचा भयानक अपघात झाला. सायकल रिक्षा घेऊन जात असताना भरधाव रेल्वे आली आणि सायकल रिक्षाचा चुराडा झाला. यामध्ये दैव बलवत्तर म्हणून चालक थोडक्यात बचावला आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की पुन्हा कधीही तो फाटक ओलांडून जाण्याची हिंमत करणार नाही. त्याने मृत्यूला जवळून पाहिलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढमधील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चक्काचूर झाला, मात्र चालक थोडक्यात बचावला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हेही वाचा- शिक्षकाचं राक्षसी कृत्य; ‘या’ कारणामुळे 7 वर्षीय विद्यार्थ्याच्या अंगावर फेकलं उकळतं पाणी
रेल्वे फाटक बंद असतानाही त्याने रेल्वे रुळ ओलांडण्याचं धाडस केलं. हे धाडस त्याला महागात पडलं. भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेसमोर त्याची रिक्षा आली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दैव बलवत्तर म्हणून चालक थोडक्यात बचावला आहे. फाटक बंद असतानाही क्रॉस करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तुरुंगात टाकलं आहे. अशा प्रकारचं धाडसं जीवघेणं ठरू शकतं त्यामुळे ही चूक कोणीही करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.