JOIN US
मराठी बातम्या / देश / Cyclone Jawad:आज संध्याकाळपर्यंत 'जवाद' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करण्याची शक्यता, ओडिशासाठी Red Alert

Cyclone Jawad:आज संध्याकाळपर्यंत 'जवाद' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करण्याची शक्यता, ओडिशासाठी Red Alert

उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी (North Andhra Pradesh) परिसरात आज संध्याकाळी जवाद चक्रीवादाळ (Cyclone Jawad) रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.

जाहिरात

Cyclone

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 डिसेंबर: उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी (North Andhra Pradesh) परिसरात जवाद चक्रीवादाळ (Cyclone Jawad) रौद्र रुप धारण करण्याची  शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे झाल्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर अंदमान समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याच्या कारणास्तव पुढील काही तासात चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. स्कायमेट नुसार, आज संध्याकाळ पर्यंत उत्तर आँध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हवामान बिघडण्याची शक्यता आहे. त्यानंतर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. एजेंसीचे असे म्हणणे आहे की, अनुकूल पर्यावरणीय परिस्थितीत जवाद चक्रीवादळ खोल समुद्राच्या दिशेने जाईल. चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, जोवाड चक्रीवादळ भुस्खलनाच्या स्तरावर पोहचण्यापूर्वी रौद्र रुप धारण करु शकतो. याच कारणामुळे उत्तर आँध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिसाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसा, बंगालच्या खाडीत मध्य भागात उत्तर-पश्चिमच्या दिशेला ते पुढे सरकरणार असून त्यानंतर पावसाची सुरुवात होईल. परंतु पावसाच्या सरी बरसण्यापूर्वी जवाद चक्रीवादळ अधिक वेग धरेल असा अंदाज आहे. तर ओडिशाच्या किनारपट्टीवर जोवाड चक्रीवादळ 4 डिसेंबर पर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिसा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ आयएमडी कडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी सौदी अरेबियाने या चक्रीवादळाचे नाव जवाद ठेवावे असे सांगितले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या