JOIN US
मराठी बातम्या / देश / KCR Birthday: संगीत, साहित्य आणि इतिहासाच्या जोरावर 'या' नेत्यानं मिळवलं राज्य

KCR Birthday: संगीत, साहित्य आणि इतिहासाच्या जोरावर 'या' नेत्यानं मिळवलं राज्य

सात वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशमधून (Andhra Pradesh) तेलंगणा या वेगळ्या राज्याची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये या राज्याची स्थापना झाल्यानंतर त्यासाठी प्रयत्न करणारे के. चंद्रशेखर राव (KCR) हे स्वतः मुख्यमंत्री (CM of Telangana) झाले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तेलंगणा, 17 फेब्रुवारी:  सात वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशमधून (Andhra Pradesh) तेलंगणा या वेगळ्या राज्याची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये या राज्याची स्थापना झाल्यानंतर त्यासाठी प्रयत्न करणारे के. चंद्रशेखर राव (KCR) हे स्वतः मुख्यमंत्री (CM of Telangana) झाले. ते जनतेत केसीआर या नावानेच प्रसिद्ध आहेत. राज्याच्या स्थापनेपासून ते मुख्यमंत्री असून पुढील 10 वर्ष देखील आपण मुख्यमंत्री राहणार असल्याचं नुकतंच त्यांनी म्हटलं आहे. आज 17 फेब्रुवारी केसीआर यांचा वाढदिवस असून त्यांच्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. याचबरोबर संगीत, साहित्य आणि इतिहासाच्या जोरावर त्यांनी कशा पद्धतीनं नवीन राज्याची (New State) स्थापना केली याची देखील माहिती सांगणार आहोत.     काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या केसीआर यांनी एन. टी. रामाराव यांच्या तेलगू देसम पार्टीमध्यही काम केलं आहे. संजय गांधी यांचे मित्र म्हणून देखील केसीआर यांना ओळखलं जाई. केसीआर यांनी 2001 मध्ये तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर हैदराबाद राजधानी असलेल्या स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी त्यांना 14 वर्ष लढा दिला आणि 2014 मध्ये राज्य स्थापन झाल्यावर त्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. काहीकाळ त्यांनी भाजपला देखील समर्थन दिलं होतं. पण त्यांचं राजकीय जीवन ज्या पद्धतीनं आकर्षक आहे त्याच पद्धतीनं त्यांनी मिळवलेल्या नवीन राज्यमागील कथा देखील तितकीच रोचक आहे. भाषा**,** इतिहास आणि गाण्यामुळं कसं बनलं राज्य ? 20 वर्षांपूर्वी केसीआर यांनी आंध्र प्रदेशपासून तेलंगणा या वेगळ्या राज्याची मागणी केली होती. परंतु राज्याच्या इतिहासाशिवाय हे शक्य नसल्याचं त्यांना माहित होतं. यामुळं त्यांनी संपूर्ण राज्यात फिरून आपल्या राज्याचा इतिहास नागरिकांना समजावून सांगितला. यामुळं नागरिकांचा आणि समर्थकांचा त्यांना पाठिंबा मिळत गेला.     (हे वाचा-राहुल गांधी यांनी दलित महिलेशी लग्न करावं, रामदास आठवलेंचा सल्ला) उस्मानिया विद्यापीठातून भाषा आणि साहित्य विषयात डिग्री मिळवलेल्या केसीआर यांना साहित्य आणि भाषेचा प्रभाव किती मोठा आहे हे माहित होते. त्यामुळं त्यांनी ‘तेलंगाना वाले जागो, आंध्र वाले भागो’ अशी घोषणा देत नवीन राज्याची मागणी केली. तेलुगूबरोबरच केसीआर यांना उर्दू, हिंदी आणि इंग्लिश भाषेचं ज्ञान आहे. कोणत्याही आंदोलनात आणि मोहिमेमध्ये गाण्यांची महत्त्वाची भूमिका असते हे केसीआर यांना माहित होते. त्यामुळं त्यांनी तेलंगणा राज्याची निर्मितीवेळी स्वतः गाणी लिहून ते गात असतं. या गाण्यांना लोकप्रियता मिळू लागल्यानंतर त्यांनी संगीतकारांकडून या गाण्यांना संगीत देत लाखो नागरिकांना एकत्रित आणण्याचं काम केलं. तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी 13 वर्ष खटाटोप केला. यामध्ये काँग्रेस सरकारच्या काळात ते केंद्रीय मंत्री देखील होते. परंतु काँग्रेस तेलंगणा या वेगळ्या राज्याच्या निर्मितीला विरोध करताना दिसल्यानंतर त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. पण 2014 मध्ये नवीन राज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली. सध्या ते कोणत्याही पक्षाच्या बाजूने नसून राज्यात त्यांच्या पक्षाची एकहाती सत्ता आहे. केसीआर यांच्या संपत्तीचे गुपित**?** केसीआर यांनी 2018 मधील निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती 23 कोटी रुपये असल्याचं दाखवलं होतं, जी 2014 निवडणुकीच्या तुलनेत 55 टक्क्यांनी जास्त होती. नुकतंच त्यांच्या 50 कोटींच्या बंगल्यांवरून देखील राजकारण सुरु झालं होतं पण त्यांच्या पत्नीच्या आणि त्यांच्या नावे कोणतीही गाडी नाही. त्यांच्या या संपत्तीच गुपित हे शेत असल्याचं म्हटलं जात आहे.   ते स्वतःला शेतकरी म्हणतात. 2018 मध्ये त्यांनी शेतीच्या माध्यमातून 7 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केल्याचं म्हटलं होतं. याचबरोबर आधुनिक शेतीतून आपण 10 कोटी  करू शकत असल्याचं देखील केसीआर यांनी म्हटलं होतं. पण एका शेतकऱ्याच्या महागड्या लाइफस्टाइलची तेलंगणामध्ये नेहमी चर्चा होत असते. (हे वाचा-निकिता जेकबची अटक लांबणीवर; टूलकिट प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा) केसीआर यांचा परिवार कसा आहे**?** केसीआर यांच पूर्ण नाव कल्वाकुंतला चंद्रशेखर राव असं आहे. त्यांच्या पत्नीचं नाव शोभा असून त्यांना 2 मुलं आहेत. त्यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी असून मुलगा केटीआर हा आमदार आणि राज्यात कॅबिनेट मंत्री देखील आहे. तर मुलगी कविता ही निजामाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार आहे. केसीआर यांचा पुतण्या हॅरिस देखील राज्यात मंत्री आहे. केसीआर यांच्या कुटुंबात एकूण 9 बहिणी आणि 1 मोठा भाऊ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या